लघुळ येथे वीज पडून एकाचा मृत्यू…

बिलोली – रत्नाकर जाधव

बिलोली तालुक्यातील मौ.लघुळ येथे आज दुपारी तीन वाजता अचानक वीज व मेघगर्जनेसह पाऊस सुरु झाला होता.यावेळी बिलोली तालुक्यातील मौ.लघुळ येथे आजोळी आलेला एका युवकाचा मृत्यू झाला आहे.

बिलोली तालुक्यातील मौ.आरळी येथील समीर शादुल शेख हा मौ.लघुळ येथे आपल्या आजोळी आला होता.आज दि.२९ सप्टेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाट व मेघगर्जनेसह पाऊस आला होता.

त्यावेळी मयत युवक हा शेतात गेला असता त्याच्यावर वीज कोसळून जागीच मरण पावला.मयत युवकाच्या वडील व भाऊ हे दोघेही वर्षांपूर्वी आरळी येथील ओढ्याला आलेल्या पुरात वाहून जाऊन मरण पावले होते.या युवकाच्या कुटूंबातील हा एकमेव युवक होता.

आधी पती व एक मुलगा पाण्यात वाहून गेले तर आज वीज पडून सदरील युवकाचा मृत्यू झाल्याने समीरच्या आईचे सर्वच उदवस्त झल्याने लघुळ व आरळी मध्ये हळहळ व्यक्त केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here