दर्यापूर-अंजनगाव मार्गावर भीषण अपघात एक ठार…चार गंभीर जखमी

चारही जखमींना अमरावती येथे उपचारार्थ हलविण्यात आले

प्रतिनिधी (किरण होले)

दर्यापूर अंजनगाव रोड पेट्रोल पंपासमोर मंगळवार रोजी रात्री सुमारे 7 च्या दरम्यान दोन मोटारसायकलची समोरासमोर धडक झाल्याने यात पाचही व्यक्ती गंभीर जखमी झाले. जखमींना उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय दर्यापूर येथे आणण्यात आले.

परंतु पाचही व्यक्तींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे तातडीने हलविण्यात आले. पाच ही जखमींना अमरावती येथे रुग्णवाहिकेत नेण्यात आले मात्र यात उमेश खर्डे कुंभारगाव वय 35 वर्ष, यांचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला.

जखमींची नावे पुढील प्रमाणे शेख मुश्ताक दर्यापूर वय 35 वर्षे साजिद दर्यापूर वय 25 वर्ष, उमेश मुरकुटे वनोजा वय 50 वर्ष ,विजय वानखडे कुंभारगाव वय40 वर्ष, असून त्यांच्यावर अमरावती येथे पुढील उपचार सुरू आहे. अपघाताचा पुढील तपास दर्यापूर पोलिस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here