निपाणी शहरालगतच्या हालसिद्धनाथ कारखान्या जवळ अपघातामध्ये एकाचा मृत्यू; आठजण गंभीर जखमी तर पाच जणांना किरकोळ दुखापत…

राहुल मेस्त्री

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी शहरालगत असणाऱ्या हालसिद्धनाथ साखर कारखान्याजवळ रविवार दिनांक 28 रोजी एका अपघातामध्ये एक ठार आठ गंभीर जखमी तर पाच जणांना किरकोळ दुखापत झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की बुलेरो पिकअप गाडी क्रमांक एम एच 07 P 2260 या गाडीतून गडहिंग्लज भागातील उसतोड संपल्यानंतर आपल्या मूळ गावी जाण्यासाठी जात असताना बोलेरो पिकप मध्ये वीस ते बावीस ऊसतोड मजूर प्रवास करत होते.

रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान पुणे-बंगलोर महामार्ग हालसिद्धनाथ साखर कारखान्या जवळ आले असता वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदर अपघात घडल्याची माहिती समोर येते आहे. ऊसतोड कामगारांना त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी ट्रॅक्टर मधून जाण्यासाठी वेळ लागेल.

म्हणून त्यांच्या मालकांने लवकर जाण्यासाठी बुलेरो पिकअप गाडी भाड्याने लावून दिली होती .मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं असं म्हणावे लागेल. सदर अपघातामध्ये मयत झालेल्या व्यक्तीचे नाव श्री रामेश्वर प्रेमसिंग राठोड राहणार दारोणा तालुका डिग्रज जिल्हा यवतमाळ असे आहे.

तर ते 34 वर्षाचे होते. सदर घटनेतील गुन्हा निपाणीतील बसवेश्वर पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे. उर्वरित गंभीर जखमी आणि किरकोळ दुखापत झालेल्या व्यक्तींना शासकीय इस्पितळात उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here