एक दिवस निसर्गाच्या सानिध्यात…

पातूर – निशांत गवई

माध्यमिक शिक्षणाधिकारी मा डॉ सुचेता पाटेकर यांच्या संकल्पनेतून व निसर्गकट्टा चे श्री अमोल सावंत व श्री संदिप वाघडकर यांच्या सहकार्याने आयोजित जागतिक पाणथळ प्रदेश दिवस निमीत्ताने आज देशभक्त कनिष्ठ महाविद्यालय तांदळी खू येथील विद्यार्थ्यांनी पातूर तलाव, निसर्गपर्यटन केंद्र माळराजुरा येथे क्षेत्र भेट दिली.

यावेळी सर्वप्रथम विद्यार्थ्यानी या परिसरातील प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बॉटल जमा करुन त्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले, तसेच पाणथळ परीसर प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प केला. त्यानंतर त्या ठिकाणी असलेले पाणथळ पक्षी रंगीत करकोचा, पांनकावळे, शेकाट्या, राखी बगळा, हळदी कुंकू इ पक्षी बघायला मिळाले.

तसेच विद्यार्थ्यांना जंगल भ्रमंती करण्यात आली यामध्ये गवताळ प्रदेश,जंगल क्षेत्र, पाणथळ प्रदेश असे विवीध भाग प्रत्यक्ष दाखऊन त्यांचे पर्यावरणीय दृष्ट्या महत्व सांगण्यात आले व नंतर तिथेच वनभोजन घेऊन निसर्ग पर्यटन केंद्राची पाहणी केली यामध्ये विवीध प्राण्यांच्या प्रतिकृती व चित्राच्या माध्यमातून माहिती घेण्यात आली,

त्यानंतर मोर्ना धरण परिसरात भेट देऊन तेथील परिसरातील पर्यावरणाची माहिती घेण्यात आली शेवटी पातूर येथील लेणी परीसर बघून या निसर्ग पर्यटनाचा समारोप करण्यात आला, यावेळी पातूर वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी वर्गाने मोलाची मदत केली. सदर कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण शिक्षक प्रा भास्कर काळे यांनी प्राचार्या कु प्रतिभा गवई यांच्या सहकार्याने केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here