संस्थाचालक विरुद्ध एक दिवसीय उपोषण…

निशांत गवई,पातूर

तालुका प्रतिनिधी – आज दि.27/08/2020 रोजी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ,पातूर द्वारा संचालित महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी एकूण दहा प्रमुख मागण्या तसेच महाविद्यालयात भौतिक सुविधांचा अभाव असल्याने महाविद्यालय प्रशासना विरोधात आज एकदिवसीय उपोषण करून संप केला.

संप करण्याआधी संस्थेत कार्यरत कर्मचाऱ्यांनी संस्थाअध्यक्ष, सचिव तसेच प्राचार्य यांच्याशी चर्चा करून व अनेक वेळा लेखी निवेदन सुद्धा दिले परंतु संस्थाचालक व प्राचार्य यांनी हेतुपुरस्सर दुर्लक्ष केले.पंचावन्न महिन्यांचे थकीत वेतन काढणे,पी.एच.डी. ची इन्क्रीमेंट लावणे,कर्मचाऱ्यांची पदनिश्चिती करणे,कर्मचाऱ्यांच्या सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करणे,सेवापुस्तिकेची दुय्यम प्रत मिळणे,महाविद्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे.

पुरुष व विशेषतः महिला कर्मचाऱ्यांकरिता महाविद्यालयात अद्यापही स्वच्छतागृह नाही तसेच विद्यार्थीनींसाठी देखील वेगळे स्वच्छतागृह तयार करणे,आदी समस्यांचे निराकरण करण्याकरिता संस्था अध्यक्ष,सचिव व प्राचार्य यांच्याकडून कर्मचाऱ्यांना पैशाची मागणी केली जात असल्याचा आरोप यावेळी कर्मचाऱ्यांनी केला व सदर बाबतीत आवाज उचलला तर अपमानास्पद बोलून महाविद्यालय परिसरातून बाहेर हाकलून लावल्या जाते.

मस्टरवर सही करू देत नाहीत.महाविद्यालयाची इमारत अपूर्ण असल्याने केवळ एकाच वर्गखोलीत कॉलेज चालविल्या जाते.महाविद्यालयात अपंग विद्यार्थ्यांकरिता रॅम्प व वेगळे प्रसाधनगृह नाही.अश्या अनेक समस्यांना कंटाळून आज महाविद्यालय प्रशासनाविरोधात हा एकदिवसीय संप करण्यात आला.

चौकट : महात्मा फुले कॉलेज ला उंचीवर नेऊन ठेवण्यात एका स्थानिक इसमाने दिवसरात्र एक केले संस्थेला 100% ग्रँड मिळताच संस्थाचालक ने त्या इसमाला दुधातुन माशी जशी काढून फेकतात त्या प्रमाणे त्या इसमला संस्थेतुन काढून टाकण्यात आले हे विशेष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here