Friday, September 22, 2023
HomeMarathi News Todayसोनिया गांधींच्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन...

सोनिया गांधींच्या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसचे दुसऱ्या दिवशीही आंदोलन…

सांगली प्रतिनिधी — ज्योती मोरे

अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा श्रीमती सोनियाजी गांधी यांना ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलावल्यामुळे काँग्रेसने मोदी सरकारविरुद्धचे आंदोलन अधिक तीव्र केले आहे. सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्यावतीने आज येथील स्टेशन चौकात निषेध आंदोलन केले.

यावेळी “नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी”, “लोकशाहीचा गळा घोटणाऱ्या भाजप सरकारचा निषेध असो”, “सोनियाजी आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देण्यात आल्या.

यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, सोनियाजींना आज पुन्हा चौकशीला बोलवले आहे. मोदी सरकारने अत्यंत सूडबुद्धीने ही कारवाई सुरू केली आहे. हा नाहक त्रास थांबवावा अशी मागणी यावेळी करत करण्यात आली. सोनियाजींच्या पाठिशी देशातील कोट्यवधी लोक उभे आहेत. एवढ्या लोकांचा आवाज देशातून उमटणार आहे. जोपर्यंत चौकशी थांबत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहणार आहे.

आंदोलनात नगरसेवक मयूर पाटील, तौफिक शिकलगार, अल्ताफ पेंढारी, सनी धोतरे, बिपिन कदम, आयुब निशानदार, याकूब मनेर, प्रशांत देशमुख, अमित पारेकर, ताजुद्दीन शेख, आशिष चौधरी, नामदेव चव्हाण, महावीर पाटील, अमित बस्तवडे, राजेंद्र कांबळे, प्रशांत देशमुख, विजय आवळे, बाबगोंडा पाटील, नायकवाडी, कैस शेख, मनीष साळुंखे, जावेद मुल्ला, शरद चव्हाण, मोईन जमादार, शैलेंद्र पिराळे, सलीम मुल्ला, सुजीत लकडे, मनोज पवार, शितल सदलगे, रईस गोकक्, अशोकसिंग रजपूत, अख्तर अत्तार, प्रशंत अहिवळे, नितीन भगत, काँगेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: