गृहमंत्र्याच्या राजीनाम्यावर संजय राऊत म्हणाले….तर सरकार चालविणे होईल अवघड!…

न्यूज डेस्क :-मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रा नंतर झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले की,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांवर तथ्य नाही असे ठरवले असेल तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. जर आपण सर्वांचा राजीनामा घेत राहिलो तर सरकार चालविणे अवघड होईल.

ते म्हणाले की, अनिल देशमुख यांनीही लेटर बॉम्बच्या आरोपावरून पोलीस आयुक्तांची हि चौकशी व्हायला हवी असे म्हटले आहे. सरकार तपासासाठी तयार असेल तर पुन्हा पुन्हा राजीनामा देण्याची चर्चा का आहे? या देशातील अनेक नेत्यांविरोधात आरोप लावण्यात आले आहेत,

जर प्रत्येकाने राजीनामा दिला तर सरकार चालवणे अवघड आहे. महाविकास आघाडीच्या तीन पक्षांमध्ये काय निर्णय घेण्यात आला आहे, जर काही निर्णय घेण्यात आला असेल तर त्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांना आहे आणि तो मंत्रिमंडळाच्या व्यासपीठावर घेतला जाईल.

यासह ते म्हणाले की आम्ही तोंडावर जे बोललो ते १०० टक्के बरोबर आहे. अशा प्रकारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून काम केले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here