Thursday, November 30, 2023
Homeराज्यबिलोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती वच्छलाबाई भिमराव गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त...

बिलोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती वच्छलाबाई भिमराव गायकवाड यांच्या पुण्यतिथी निमित्त नेरली कुष्ठधाम येथे मतिमंद व कुष्ठरोग्यांना अन्नदान…

Spread the love

नांदेड – महेंद्र गायकवाड

बिलोली नगर परिषदेच्या माजी नगरसेविका श्रीमती वच्छलाबाई भिमराव गायकवाड यांची पुण्यतिथी नेहमी प्रमाणे सामाजिक उपक्रम राबवित साजरी करण्यात आली. वच्छलाबाई गायकवाड यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त 16 ऑक्टोबर रोजी भीमा बहूउदेशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने नेरली येथील नंदनवन कुष्ठाधाम येथे मतिमंद व कुष्ठरोग्यांना अन्नदान करण्यात आले.

यावेळी बहुजन नेते तथा शिवसेनेचे देगलूर बिलोली विधानसभेचे इच्छुक उमेदवार मंगेश कदम, महेंद्र गायकवाड, सौ. अनुपमा महेंद्र गायकवाड, मनपा शिक्षण विभागाचे संजय ढवळे, सौ. सुनीता संजय ढवळे, शशिकांत गाढे पाटील, प्रवीण वाघमारे, कालिदास रेब्बा, कुष्ठाधामचे अधीक्षक गायकवाड, सुनील ढुमणे बरबडेकर यांच्या सह अनेक जण उपस्थित होते.

महेंद्र गायकवाड हे आपल्या आई वडिलांची पुण्यतिथी व कुटुंबियांतील सदस्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात त्यामुळे सामाजिक उपक्रमात गायकवाड कुटुंबियांचे योगदान मोठे असल्याचे मनोगत मंगेश कदम यांनी यावेळी व्यक्त केले.

गायकवाड यांनी आज पर्यंत मोफत नेत्ररोग तपासणी शिबीर, कोरोनाच्या काळात मास्क व सॅनिटाईजर, रुग्णांना फळे व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, दिव्यांग विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: