नालासोपारा पूर्व मोरेगाव विभागात  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्यावतीने प्रजासत्ताकदिननिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद…

नालासोपारा (धीरज घोलप )                           

 नालासोपारा पूर्व येथील नागीनदास पाडा मोरेगाव विभागामधील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने प्रजासत्ताकदिनानिमित्त आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबिराला रक्तदात्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

कोरोना काळात विभागातील रहिवाशांना अन्नधान्य पुरवठ्यापासून ते अत्याआवश्यक  सेवा देणाऱ्या प्रत्येकांना कोरोना योद्धा पुरस्कार देवून मान्यवरांच्याहस्ते गौरविण्यात आले .महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पालघर मा.तालुका अध्यक्ष नितीन मोरे आणि शहर अध्यक्ष  अमित नारकर, विभाग अध्यक्ष  सुमित पवार उपविभाग अध्यक्ष  मंगेश भालेराव आणि संदीप गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

सर्वं मनसे सैनिकांचे आणि नागरिक यांचे आयोजकांनी मनापासून आभार  मानले.या भव्य रक्तदान शिबिराला  १३५ रक्त दात्यांनी रक्तदान केले.  तर विभागातील रहिवाशांना कधीही रक्ताची गरज भासल्यास आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी असून, कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही अशा ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन  अमित नारकर यांनी मत व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here