रामनवमी निमित्त मनसे महिला आघाडीने राबविला “एक घर,एक झाड” हा उपक्रम…

अमरावती :- सध्याची करोनारुपी परिस्थिती लक्षात घेता पर्यावरण संवर्धन करणे ही काळजी गरज आहे त्या अनुषंगाने आज दिनांक 22।4।21 ला श्री रामनवमीच्या पावन पर्वावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महिला आघाडीच्या वतीने सर्व महिला पदाधिकारी व कार्यकारिणीने आपापल्या परिसरात “एक घर,एक झाड” हा उपक्रम राबवून वृक्षारोपण

करीत श्रीराम नवमी उत्सव उत्साहात साजरी केली.या उपक्रमावेळी महिला आघाडी जिल्हाध्यक्ष रिनाताई जुनघरे,शहर अध्यक्ष वृंदाताई मुक्तेवार उपाध्यक्ष निर्मला ताई बोडे,उपाध्यक्ष वंदना किल्लेकर,उपाध्यक्ष संगीता मडावी,उपाध्यक्ष छाया ताई रायबोले,उपाध्यक्ष दितीका हिवलेकर,मनीषाताई गवई आदींची उपस्थिती होती. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष पप्पू भाऊ पाटील,महानगर अध्यक्ष संतोष बद्रे व मनसे कार्यकर्त्यांचे विशेष सहकार्य मिळाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here