स्व.भोलाशंकर गुप्ता स्मृती दिनानिमित्त बालगृहात मिष्ठान्न भोजन व वस्त्र वाटप…

दर्यापूर(ता.प्रतिनिधी)-श्री गाडगे महाराज बालगृह बनोसा दर्यापूरचे आश्रय दाते तथा मूर्तिजापूर येथील श्रीमंत,उदार, दयाळू स्व.भोलाशंकर हिरालालजी गुप्ता यांचा प्रथम स्मृतिदिन श्री संत गाडगे महाराज बालगृह बनोसा येथे साजरा करण्यात आला.

त्यानिमित्ताने सर्वप्रथम गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन तथा माल्यार्पण करण्यात आले ल.त्यानंतर उपस्थित सर्व मुलांना विद्यार्थ्यांना रंगीत ड्रेसचे वाटप करण्यात आले व त्यानंतर उपस्थित सर्वांना मिष्ठान्न भोजनदान देण्यात आले.

यात त्यांचे सुपुत्र संजय भोलाशंकर गुप्ता यांचे मोलाचे सहकार्य मिळाले,बाल गृहाला मोलाचे सहकार्य केल्याबद्दल संचालक गजानन देशमुख यांनी गुप्ता परिवाराचे आभार मानले.तसेच मंगेश देशमुख कंजरा यांचे सुद्धा सहकार्याबद्दल आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here