९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यात प्रहार क्रांती सप्ताह व प्रहार महासदस्य नोंदणीला सुरवात…

गोंदिया :- ९ ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त गोंदिया जिल्ह्यात व संपूर्ण महाराष्ट्रात ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट पर्यंत प्रहार क्रांती सप्ताहाला सुरवात करून प्रहार महा सदस्य नोंदणी अभियानाला सुद्धा सुरवात करण्यात आली.

त्या निमित्ताने तिरोडा तालुक्यातील नवेझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यावरती बसलेली धूळ साफ करून, पाण्याने स्वच्छ धुऊन, पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.

यावेळी प्रहार गोंदिया जिल्हाध्यक्ष महेंद्र भांडारकर, जिल्हा सचिव महेंद्र नंदागवळी, तिरोडा तालुका अध्यक्ष प्रदीप निशाने, अर्जुनी/मोर. तालुका अध्यक्ष कार्तिक मानकर, तालुका सचिव सुनिल नाकडे, सालेकसा तालुका अध्यक्ष अभय कुराहे, उपाध्यक्ष मिथिलेश दमाहे, सचिव अजय मच्छीरके, सालेकसा शहर प्रमुख विशाल दसरिया, आमगाव तालुका अध्यक्ष सुनिल गिरडकर, नवेझरी ग्राम मंडळ उपाध्यक्ष प्रभुदास उके, प्रहार सेवक उरकुड उके, राजू नांदगावे इत्यादी प्रहार पदाधिकारी प्रहार कार्यकर्ता उपस्थितीत होते.

गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुका पदाधिकारी यांना प्रहार क्रांती सप्ताह दिनानिमित्त प्रहारच्या गोंदिया जिल्हा ग्रामिण कार्यालय नवेझरी येथे विशेष सभा घेऊन विविध कार्यक्रम आयोजन करण्याचे सूचना देण्यात आल्या व प्रहार सदस्य नोंदणी ला सुरवात करून सदस्यांचे नोंदणी फार्म भरून येणाऱ्या जिल्हा परिषद/पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर्ती चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here