रखडलेले एमपीएससी व पोलिस भरती विद्यार्थ्यांच्या जीवावर, आत्महत्येमुळे एमपीएससी विद्यार्थी मध्ये रोष…

अकोट – कोरोना संकटामुळे स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात आलेल्या काही परीक्षांचे निकाल अद्याप लागलेले नाहीत, तर काही परीक्षाच झाल्या नसल्याने लाखो विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.दरवर्षी सुमारे दोन लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांसाठी अर्ज करतात. अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून रात्रंदिवस अभ्यास करतात.

गेल्या दोन वर्षांत कोरोना महामारीमुळे ‘एमपीएससी’चे वेळापत्रक बिघडले आहे. फेब-ुवारी 2019 ला राज्यसेवा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण उमेदवारांना अद्याप नियुक्ती दिलेली नाही. जानेवारी 2020 मध्ये पीएसआय, एसटीआय, एएसओ या संयुक्त गट ब परीक्षा कोरोनाच्या नावाखाली पाच वेळा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्या परीक्षेची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. 2020, 2021 मधील विविध पदांची जाहिरात अद्याप काढलेली नाही.

कोरोनामुळे परीक्षा वेळेत न झाल्याने अनेक विद्यार्थ्यांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. वर्षानुवर्षे विद्यार्थी अभ्यासच करीत आहेत. गेल्या दोन वर्षांत अनेकांनी ‘एमपीएससी’ सोडून दुसर्‍या पर्याय शोधला आहे. मिळेल ती नोकरी अनेकांनी पत्करली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांचा संयम सुटत चालला आहे.

तसेच पोलिस दलात भरती होवून देश सेवेचे स्वप्न उराशी बाळगुन असणाऱ्या तरुणांच्या पदरी निराशा कायम आहे. भरती प्रक्रिया गेल्या ३ वर्षांपासून रखडल्यामुळे तरुणांमध्ये निराशेचे वातावरण आहे. ग्रामीण भागातील हजारो तरुण खाकी साठी धावत असतात. भरती होवून भविष्य घडवु पाहणाऱ्याला तरुणांना या कालावधीत चिंतेने ग्रासले आहे.

सरकारने विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी परीक्षार्थींमधून होत आहे. सदर उपविभागीय अधिकारी अकोट यांना आज निवेदन मधून विद्यार्थि यांनी मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here