१४ व्या दिवशी ही पेट्रोल,डिझेलच्या किंमतीत वाढ…नवीन दर सकाळी ६ वाजल्यापासून लागू…

देशात एकीकडे संकट असतांना दुसर संकट हि पेट्रोल आणि डीझेल गेल्या १४ दिवसापासून दरवाढीने सामान्यांना हैराण केले आहे.शनिवारी सलग १४ व्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ करण्याचा कल कायम आहे.

देशाच्या राजधानीत पेट्रोल ५१ पैशांनी तर डिझेल ६१ पैशांनी महागले आहे. या वाढीमुळे पेट्रोलची किंमत दिल्लीत प्रति लिटर ७८.८८ रुपये झाली आहे, तर डिझेलची किंमत प्रतिलिटर ७७.६७ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल सलग १४ दिवसांत ७.६१ रुपये प्रति लीटर महाग झाले आहे आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ८ रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

तेल विपणन कंपन्यांनी शुक्रवारी दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नई मधील पेट्रोलच्या दरात अनुक्रमे ५६ पैसे, ५४ पैसे, ५५ पैसे, ५० पैसे प्रतिलिटर वाढ केली.

चार महानगरांमध्ये डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे ६३ पैसे, ५७ पैसे, ६० पैसे आणि ५४ पैसे वाढ झाली आहे. दररोज सकाळी सहा वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here