आज रामटेकात व्यापाऱ्यांनी स्वयफुर्तीने प्रतिष्ठाने ठेवली बंद…

राजू कापसे, रामटेक

रामटेक:कोरोना विषाणूची साखळी तोडण्याच्या उद्देशाने शनिवार-रविवार दोन दिवस नागपूर जिल्ह्यात मिनी लोकडाऊन करीत जीवनाश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या प्रशषणाला निर्णयाला प्रतिसाद देत स्थानिक व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयफुर्तीने बंद ठेवली.

रामटेक शहर व्यक्तिरिक्त ग्रामीण क्षेत्रातील बाजारपेठही आजही बंद आहेत.रविवारी सकाळपासूनच मुख्य बाजारपेठ गांधी,नेहरू,किसान,सुपर मार्केट,बस स्टँड येथील दवाखाने औषधालये,दुध,फळ,भाजेपल्याची दुकाने तेवढी उघळी दिसत आहेत.तर बाकी सर्व सेवा बंद आहेत.

तुरळक लोक फक्त कामासाठी बाहेर रस्त्यावर दिसत आहेत.कुठेही मोठी गर्दी दिसत नाही.पोलिसांनी यावेळी चौकाचौकात बंदोबस्त लावलेला नाही हे विशेष कुठेही दंडुकशाही जबरदस्ती नाहि तरीही लोकआता शिस्तीने स्वयफुर्तीने बंद पळत असल्याचे चित्र आहे.आज रविवार रामटेक येथे असलेला आठवडि बाज़ार रद्द करण्यात असल्या असल्याचे हसीलदार बाळासाहेब मस्केव्यानी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here