नगरपरिषदेच्या वतीने बिलोलीतील स्मशान भुमीत मियावाकी पद्धतीने १४०० झाडांचे वृक्षारोपण – ओमप्रकाश गौंड…

बिलोली – रत्नाकर जाधव

बिलोली नगरपरिषदेच्या वतीने कुंडलावाडी रस्त्या लगत असलेल्या स्मशान भुमीत मियावाकी पद्धतीने १४०० झाडाचे वृक्षारोपण कारण्यात आले.नायब तहसीलदार तथा न.प.चे प्रभारी मुख्याधिकारी ओमप्रकाश गौंड यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन केले.

येथील नगर परिषदेच्या वतीने शासनाने दिलेल्या सूचनेनुसार बिलोली- कुंडलावाडी रस्त्या लगत असलेल्या स्मशान भुमीत मियावाकी पद्धतीने १४०० झाडाचे वृक्षारोपण करण्यात आल्याची माहिती बिलोली ताहसीलचे नायब तहसीलदार तथा नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी ओमप्रकाश गौंड यांनी दिली आहे.

यामध्ये सागवान,शिरस, चिंच, आवळा, कडुनिंब, करंज या झाडांचा समावेश आहे.एक बाय एक अंतरात पाच झाडे ज्यात चारही बाजूने व मध्यभागी एक औषधी वनस्पती या पध्दतीने वृक्षारोपण केले असल्याची माहिती ही मुख्याधिकारी ओमप्रकाश गौंड यांनी यावेळी दिली आहे.नगरपरिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन स्वतः उपस्थित राहून या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.

या केलेल्या वृक्षारोपणाच्या सुरक्षेसाठी सभोवताली तारेचे कुंपण करण्यात येत असून या झाडांच्या संगोपनासाठी नगरपरिषदेचे कर्मचारी वेळे नुसार नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.वृक्षारोपण नंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here