संभाजी ब्रिगेडच्या वतीने चिखलीतील कोवीड सेंटर येथील डॉ.सौ. मनीषा अमर खेडेकर व त्यांचे सहकारी कोरोना योद्ध्यांचा सत्कार…

बुलढाणा :- अभिमान शिरसाट
संपूर्ण जगावर गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातला आहे आणि या अशा कठीण परिस्थितीमध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अविरतपणे कोरोना रुग्णांची सेवा करण्याचे काम या कोरोना योध्या कडून सुरू आहे. त्यांच्या या सेवेची दखल घेऊन त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी संभाजी ब्रिगेडच्या वतीने चिखली येथील डॉ.सौ. मनीषा अमर खेडेकर व त्यांचे सर्व सहकारी या सर्वांचा कोरोना योद्धे म्हणून सत्कार सन्मानित करण्यात आले.

या कोरोना योद्ध्यांच्या सन्मानाच्या व सत्काराच्या वेळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हा कार्याध्यक्ष विकास खंडागळे, चिखली विधानसभा अध्यक्ष आकाश लंबे, तालुका सरचिटणीस संजय काकडे, तालुका सचिव निलेश मोरे, शहराध्यक्ष अमोल देशमुख, शहर सरचिटणीस निखिल पाटील, उपशहर अध्यक्ष धनंजय देशमुख, शुभम तांगडे, शहराध्यक्ष विद्यार्थी आघाडी देवराज सवंडकर सह कोवीड सेंटरमधील सर्व स्टाफ व कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here