भारतीय जनता पार्टी पातुर तालुका व शहर यांचे वतीने मंठा येथील वैष्णवी गोरे या माळी समाजातील युवतीचा खुन प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी…

अशा मागणीचे निवेदन पातुर तहसीलदार यांना देण्यात आले …!!

पातूर

जालना जिल्ह्यातील मंठा येथील वैष्णवी गोरे खुन प्रकरणी सदरील प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवुन आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या करिता पातुर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

मंठा येथील वैष्णवी गोरे यांच्यावर मंगळवारी सायंकाळी चार ते पाच वाजेच्या दरम्यान मंठा शहरातील बाजारपेठ आरोपी शेख अल्ताफ बाबु याने धारदार शस्त्राने गळा कापून खुन केला.
पाच दिवसापुर्वी वैष्णवी गोरे हिचा विवाह झाला होता, रिक्षा चालवून उदरनिर्वाह करणारे गोरे कुटुंबातील एकुलती एक मुलगी होती.

अठराविश्व दारिद्रय तसेच हालाकीच्या परिस्थितीशी दोन हात करत वडिलांनी वैष्णवीचा विवाह केला होता, चार दिवसापुर्वी वैष्णवीचा विवाह झाला असताना, विवाहानंतर मंठा येथे आलेल्या वैष्णवीचा आरोपी शेख अल्ताफ बाबु याने निर्दयीपणे धारदार शस्त्राने खुन केला.

आरोपीला फाशीची शिक्षा करण्यात यावी व सदरील प्रकरण हे फास्ट्रटँक कोर्टात चालवण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता पार्टी पातुर तालुका व शहर यांच्या वतीने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here