राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माँ साहेब जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले यांचा संयुक्त जयंती उत्सव व राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टी चे पदाधिकारी ची नियुक्ती संपन्न..!

न्युज डेस्क – मंगळवार दि.12 जानेवारी 2021 रोजी,ठाणे जिल्हा-दिवा शहर विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉ. जितेंद्र आव्हाड साहेब गृहराज्य मंत्री ह्यांच्या आदेशानुसार. श्री आनंद परांजपे साहेब ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष ह्यांच्या मार्गदर्शना खाली दिवा विभागाचे नेते मा.मनोज कोकणे (ठाणे जिल्हा चिटणीस) यांच्या अध्यक्षखाली आणि श्री.निलेश कापडणे(दिवा शहर ब्लॉक अध्यक्ष),

यांच्या नेतृत्वाखाली तसेच श्री.सूर्यकांत कदम(दिवा ब्लॉक 27 अध्यक्ष) यांच्या नियोजना खाली स्वराज्य जननी माँ साहेब जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले यांचा संयुक्त जयंती उत्सव संपन्न करून याच महामातांच्या जयंतीचे औचित्य साधून दिवा विभागातील राष्ट्रवादी ‘युवती’ काँग्रेस पक्षाच्या’ कार्यकर्त्यांची ‘पदं’ नियुक्ती राष्ट्रीय पक्षाध्यक्ष आदरणीय श्री.शरदचंद्रजी पवार, संसदरत्न आद. सौ.सुप्रियाताई सुळे पक्षाचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री,महाराष्ट्र राज्य ना.डाॅ. जितेंद्र आव्हाड,

मा.आनंद परांजपे(ठाणे शहर अध्यक्ष जिल्हा) तसेच सन्मा.कु.सक्षणाताई सलगर(महाराष्ट्र प्रदेश युवती अध्यक्षा) यांच्या शुभशिर्वादाने युवती अध्यक्षा ठाणे शहर (जिल्हा) मा.पल्लवीताई जगताप यांनी सौं पुजाताई मोहिते यांची दिवा शहर युवती ब्लॉक अध्यक्षा पदी तर सौं नेहाताई कोकणे यांची दिवा ब्लॉक 28 युवती अध्यक्षा पदी स्वाक्षरी करून त्यांना नियुक्ती करून त्यांना नियुक्ती प्रमाण पत्र देण्यात आले,

तर शितलताई लाड यांची दिवा शहर युवती कार्याध्यक्षा पदी नियुक्ती करून ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्षा मा.डाॅ.राणीताई देसाई यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाण पत्र देण्यात आले. तर कविता काळे-पाटील यांची दिवा शहर ब्लाॅक युवती सरचिटणीस पदी नियुक्ती करून मा.सुलोचनाताई हिरा पाटील(नगर सेविका,प्र.क्र.29 ठा.म.पा.),यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाण पत्र देण्यात आले तसेच शशिकला लोखंडे यांची दिवा ब्लॉक क्र.27 युवती अध्यक्षा पदी नियुक्ती करून पुजाताई शिंदे(कळवा,मुंब्रा युवती अध्यक्षा)

यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाण पत्र देण्यात आले.तर संगिताताई कारंडे यांची दिवा ब्लॉक क्र.28 (अ) युवती विभागिय अध्यक्षा पदी नियुक्ती करून मा.प्रतिभाताई कापडणे(वाॅर्ड नं 1,महिला अध्यक्षा,घोडबंदर रोड,ठाणे) यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाण पत्र देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे मा.शेखर भालेराव(ठाणे शहर चिटणीस) यांनी राजमाता जिजाऊ आणि सावित्रीमाई फुले तसेच स्वाॅमी विवेकानंद यांच्या जिवनकार्या विषयी माहिती सांगुन सर्वांना संबोधित केले.

तर ज्या विद्यार्थ्यांना चांगली टक्केवारी मिळाली आहे.त्या विद्यार्थ्यांचा मा.नगरसेविक हिरा पाटील यांच्या हस्ते व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ‘वह्या’ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जयंतीचे औचित्य साधून दिवा ब्लॉक क्र.27 येथील सौ.मयुरी तळेकर आणि भारती लोखंडे यांनी मा.मनोज कोकणे,निलेश कापडणे,सूर्यकांत कदम यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित दिवा शहर युवती ब्लॉक अध्यक्षा मा.पुजाताई मोहिते यांच्या हस्ते पक्षाचा मफलर घालुन पक्ष प्रवेश केला.

तसेच मा.अनवर खलिपे(ठाणे शहर सचिव,प्रहार अपंग क्रांति संस्था) यांचा त्यांची सुविध्य पत्नी सौ.मैरूनिसा खलिपे या दाम्पत्याचा हि शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्याच प्रमाणे मा.मोहन गोळे,उत्तम ताटे,अस्मिता ताटे (सकल मराठा संघ-दिवा सदस्य) यांचा हि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कु.हिमांशु कदम,जनक वाघमारे,शंकर कांबळे-चाटोरीकर,साई आहिरे,कमलेश कापडणे तर महिला कार्यकर्त्य:भारतीताई कोकणे,सविता मोरे,सारीका झरेकर,शोभाताई चौरसिया,विद्या डोलाई,चेतना कदम,काजल कापडणे यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मा.मनोज कोकणे यांनी केले तर सुत्रसंचालन सूर्यकांत कदम यांनी केले.(या कार्यक्रमाची काही क्षणचित्रं)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here