दिवंगत व्यक्तीच्या नातेवाईकांना कौटुंबिक ‘आधार’
ठाणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस दिवा शहर ब्लॉकमार्फत दिवंगत नंदलाल मोर्या यांच्या नातेवाईकांना कौटुंबिक आधार म्हणून अन्न- धान्य आणि आर्थिक मदतीचा हात पुढे केला. दिवा शहर ब्लॉक अध्यक्ष निलेश कापडणे, कार्याध्यक्ष सूर्यकांत कदम आदी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
दिवा पूर्वेकडील बी.आर.नगर. साईकुंज इमारतीत राहणारे नंदलाल मोर्या यांचे अल्पशा आजाराने सोमवारी (ता.१५)निधन झाले. असता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी मोर्या यांच्या घरी जाऊन कुटुंबांचे सांत्वन करून आदरांजली वाहिली.
तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून संबंधित कुटुंबाला आधार म्हणून एक गोणी तांदूळ आणि अन्न- धान्य किराणा किट तशीच आर्थिक मदतही देण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेस दिवा शहराचे ब्लॉक कार्याध्यक्ष सूर्यकांत कदम यांनी दिवा विभागाचे नेते तथा ठाणे जिल्हा चिटणीस मनोज कोकणे यांच्याशी चर्चा करून दिवा शहर ब्लॉक अध्यक्ष निलेश कापडणे यांच्या अध्यक्षतेखाली मदत दिल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, दिवा शहर महिला ब्लॉक अध्यक्षा सौ.भारतीताई कोकणे, दिवा शहर युवती ब्लॉक अध्यक्षा सौ.पुजाताई मोहिते,सौ.चेतनाताई कदम,सौ.अस्मिताताई ताटे तसेच युवक कार्यकर्ता हिमांशु कदम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.