पोषण अभियान जनजागृती कार्यक्रम; आता तरी कुपोषणची समस्या संपेल अशी आशा धरूया…

डहाणू – जितेंद्र पाटील

एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प अंतर्गत विक्रमगढ तालुक्यातील तलवाडा बिट मधील मुख्य सेविका सुवर्णा कामडी यांच्या कडून पोषण रॅली चे आयोजन करण्यात आले.यामध्ये पोषणगीत घोषवाक्य बॅनर, पोस्टर, सोबत घेऊन कुपोषणच्या विविध विषयांवर जनजागृती केली. बिट मधील सर्व पाड्या-पाड्यात मुख्य सेविका, अंगणवाडी ताई, किशोरी मुली गरोदर माता, स्तनदमाता बालकांच्या माता यांचा सहभाग घेऊन पोषण अभियान कार्यक्रम राबवला जात आहे.

कुपोषणमुक्तीसाठी मोठी मोहीम राबविण्यात येत असून पोषणाचे महत्त्व लोकांना पटवून देण्यात येत आहे. याच मोहिमेचा भाग म्हणून सकस आणि पोषण आहाराचे महत्त्व
अन्न ही मानवी जीवनाचे अस्तित्व टिकविण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे. शरीराची वाढ होणे, झीज भरुन काढणे, ऊर्जा निर्मिती, कार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात.

त्यामुळे आहारात घेतलेले अन्न पोषणदृष्ट्या समतोल हवे. शरीरपोषण व संवर्धन यासाठी प्रथिने, पाणी, जीवनसत्व व खनिज द्रव्ये ह्यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे. कोणत्याही एकाच खाद्यपदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्य नसल्याने या सर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारात विविध पदार्थ समाविष्ट करुन साधले पाहिजे.

घराघरात पोषण अभियानाची ज्ञानज्योत पेटत आहे. यासाठी सिद्धाराम सालीमठ मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. पालघर, प्रवीण भावसार जिल्हा कार्यक्रम अधिकारी जि. प. पालघर राजेंद्र खताळ गटविकास अधिकारी विक्रमगड, बापू शिनगारे बालविकास अधिकारी विक्रमगड यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here