न्यूज डेस्क- पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण हे दिवसेदिवस वाढत चाललय तर आज पुण्यात अनेक ठिकाणी दहशत असणाऱ्या एका कुख्यात गुंडाची दगडाने ठेचून निर्घुण हत्या करण्यात आली आहे.
शैलेश घाडगे असं हत्या झालेल्या कुख्यात गुंडाचं नाव आहे. पुण्याच्या खराडी भागातील मोकळ्या मैदानात त्याला दगडाने ठेचून त्याला ठार मारण्यात आलंय. सदर घटना आज सकाळी पहाटेच्या सुमारस खराडी परिसरात ही घटना घडलीये.
शैलेश घाडगे अनेक गुन्ह्यांमध्ये शैलेश आरोपी होता. शैलेशच्या नावावर अनेक गुन्हे पोलीस ठाण्यात नोंद आहेत.मारेकऱ्यांनी डोक्यात दगड घालून त्याची हत्या केलीये.या प्रकरणी पुणे पोलिसांनी कोणालाही अटक केली नसून याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.