शरद नागदिवे
नागपुरातील कुख्यात जुगार अड्डा चालक बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची कार मध्ये धारदार शस्त्राने भरदिवसा हत्या केली असून परिसरात भीतीचे वातावरण झाले आहे. नागपुरातील सीताबर्डी पुलिस स्टेशन अंतर्गत भोले बाबा पेट्रोल पंप जवळ,चार ते पाच साथीदाराने मिळून धारदार चाकु व कुऱ्हाडी ने वार करुन बाल्या उर्फ किशोर बिनेकर याची निर्घुण हत्या केली आहे. सदर घटनेचा CCTV व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे.
भोले बाबा पेट्रोल पंप जवळ चौकावर फिल्मी स्टाईलने बाल्या बिनेकर बसलेल्या कारचा बाईकने पाठलाग करत आलेल्याआरोपी दुचाकीने पाठलाग करीत आले होते,किशोर बिनेकर असून ते आपल्या वर्णा गाडीने भोळे पेट्रोल पंप कडून जात असताना पाच आरोपींनी त्यांना अडवून बाहेर काढलं आणि शस्त्राने वार करून त्याची हत्या केली.
त्यानंतर आरोपी पसार झाले आहेत.मृतक हा गोळीबार चौकतील सावजी भोजनालय चालवायचा तसेच नागपुर शहरात जुगार अड्डा चालवायचा, घटना स्थळी सीताबर्डी पुलिस , क्राईम ब्रांच पथक तसेच वरिष्ठ अधिकारी पोहचले आहेत , घटना क्रम सीसीटीव मध्ये कैद झालेला आहे