कुख्यात गुन्हेगाराचा दारू पिऊन भररस्त्यात मैत्रिणीसोबत कारवर डान्स…

न्यूज डेस्क – तुरुंगातून बाहेर आलेल्या कुख्यात गुन्हेगाराचा भररस्त्यात दारू ढोसत तरुणीसोबत डान्स कारवर डान्स. कारच्या टपावर उभे राहत दारू घेत आणि सिगरेट ओढत तो आढळून आल्याने पोलिसही हादरून गेले आहेत. या डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने शेवटी पोलिसांनी त्याला अटक केली असून तरुणीचा शोध सुरु आहे.

गारखेडा परिसरातील कुख्यात गुन्हेगार शेख जावेद उर्फ टिप्या शेख मकसूद याच्यावर पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. गेल्यावर्षी एका खून प्रकरणात त्याचा समावेश होता.

13 जुलै 2019 रोजी त्याने प्रमोद दामोदर खाडे याला रात्री साडेअकराच्या सुमारास मारहाण करुन लुटले होते. त्यानंतर त्याला पुंडलिकनगर पोलिसांनी अटक करत पिस्तुल व जिवंत काडतुसे हस्तगत केली होती.

याशिवाय विनयभंगाचे देखील गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारीचा आलेख वाढत असल्यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी 9 ऑक्टोबर 2019 रोजी स्थानबध्दतेची कारवाई करत त्याची हर्सुल कारागृहात रवानगी केली होती.

त्यामुळे पोलिसांच्या डोक्यावरील बराचसा भार कमी झाला होता. मात्र, ही डोकेदुखी 30 सप्टेंबर रोजी हर्सुल कारागृहातून बाहेर पडली. त्यादिवशी देखील त्याच्या स्वागतासाठी अनेक गुन्हेगारांनी हर्सुल कारागृहाबाहेर गर्दी केली होती.

या गुन्हेगारांनी त्याच्यासोबत कारागृहाबाहेरच फोटोसेशन करत व्हिडीओ फेसबुकवर टाकले. कारागृहातून सुटका होताच टिप्याने पुन्हा धुडगूस घालायला सुरूवात केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here