रामटेक तालुक्यात कोविड केअर सेंटर बाबत प्रशाशन गंभीर नाही – उदयसिंग यादव माजी उपसभापती प स रामटेक तथा महासचिव ना ग्रा जिल्हा काँग्रेस…

रामटेक – राजु कापसे

रामटेक तालुक्यातील रामटेक येथे एकलव्य निवासी छत्रवास अंतर्गत कोविड केअर सेंटर दि 5-12-2020  पासून पूर्णतः बंद आहे.सध्या राज्यात कोविड-19 या वैश्विक महामारीचा प्रादुर्भाव थांबलेला नसून अधून-मधून रुग्ण संख्येमध्ये घट-वाढ होत आहे.

रामटेक तालुक्यातील सर्वसामान्य जनता हि उपचाराकरिता नागपूरला जाण्यास तयार होत नाही व खाजगी रुग्णालयामध्ये आर्थिक टंचाईपणा मुळे उपचार करणे सामान्य लोकांचे शक्य होत नाही,याकरिता रामटेक तालुक्यातील रुग्णाची गैरसोय होऊन कुटूंबातील व्यक्ती दगावाला जाऊ नये व कोविड 19 चा महामारीचा प्रादुर्भाव थांबे पर्यंत रामटेक येथे कोविड केअर सेंटर सुरु ठेवण्यात यावे असे पत्र मी दि 11 डिसेंबर 2020 ला पालकमंत्री यांना दिले,

व त्यांनी याचि तात्काळ जिल्हाधिकारीं यांना याबाबत कार्यव्हाव्ही करावी  असे सांगितले परुंतु ते पत्र आपत्ती व्यस्थापन मध्येच पडून आहे या वरून शासन किती गंभीर आहे असे दिसून येते.रामटेक तालुक्यात रामटेक,कन्हान,मौदा,परशिवनी ,देवलापार येथे शासकीय वसतिगृह आहे.

त्यांचा उपयोग कोविड केअर सेंटर साठी व्हावला हवा व मेडिकल,मेवो येथे जे अंतिम वर्षांतील विध्यर्थी आहे त्यांचा उपयोग येथे व्हाव्हा जेणेकरून रुग्णांना प्राथमिक उपचार तरी मिळेल.आज  हे कोविड सेंटर सुरु करवे जेणेकरून  रामटेक तालुक्यातील रामटेक ,देवलापार,मौदा ,परशिवनीयेथील लोकांना याचा फायदा झाला होईल व कितीतरी लोकांचे प्राण जाईल नाही असे यावेळी काँग्रेस नेते गज्जू यादव यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here