ई स्टोअर परिवारातील एकालाही कोरोणाची बाधा झाली नाही; ई स्टोअर इंडिया प्रमुख राऊत…

राहुल मेस्त्री

कोरोनाव्हायरसच्या महामारीत ई स्टोअर इंडिया परिवारातील एकाही सदस्याला कोरोनाची बाधा झालेली नाही असे प्रतिपादन ई स्टोअर इंडियाचे प्रमुख विनायक राऊत म्हणाले .ते निपाणी शहरात नव्याने उद्घाटन केलेल्या ई स्टोअर इंडिया शाखा निपानी येथे उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

ते पुढे म्हणाले प्रत्येक घराघरात आरोग्य पोहोचवण्याचा आमचा हेतू असून 2022 सालापर्यंत तीस कोटी जनतेपर्यंत पोहोचण्याचे आमच्या कंपनीचे उद्दिष्ट आहे. आजपर्यंत देशभरात 6000 लोकांना इ स्टोअरच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध केला असून नेटवर्किंग मध्ये दहा हजार पेक्षा अधिक लोक काम करत आहेत.

गेली सतरा वर्षे कंपनीचे काम सुरू असून सरकारच्या आवश्यक त्या सर्व मान्यता घेऊन कंपनीची वाटचाल यशस्वी होत आहे.असे मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करताना शिवाजी साळुंखे म्हणाले निपाणी परिसरात इ स्टोअर इंडिया निर्माण करुन एक नव्या रोजगाराची संधी उपलब्ध झाली असून याचा लाभ नागरिकांनी घेणे गरजेचे आहे.

या इ स्टोअर इंडिया शाखा निपाणीचे उद्घाटन आणि दिपप्रज्वलन आडी मठाचे श्री सिद्धेश्वर महाराज, जोल्ले उद्योग समूहाचे प्रमुख बसव जोले आणि ई स्टोअर इडियाचे प्रमुख विनायक राऊत यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना बसव जोल्ले म्हणाले निपाणी सारख्या परिसरात ई स्टोअर निर्माण केल्याबद्दल प्रथमता त्यांचे अभिनंदन करतो. यासाठी आपल्याकडून जितकी शक्य असेल तितकी मदत देखील करू असे मनोगत व्यक्त केले.

यावेळी निपाणीचे नगराध्यक्ष जयवंत भाटले,नगरपालिका सभापती सद्दाम नगारजी, अनिल पाटील, सागर सावर्डेकर, चद्रकांत बाबर ,सचिन साळुंखे ,दयानंद पाटील ,मंजुनाथ दुर्गण्णावर यांच्यासह ई स्टोअर इडियाचे अनेक सदस्य उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here