दिवाळी नंतर अमरावती शहरात मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडत आहे तर आठवड्याभरापासून अमरावती शहरात कोरोना रुग्णांची संख्या देखील झपाट्याने वाढत आहे मात्र नागरिक घराबाहेर पडत असतांना तोंडाला मास्क लावत नसल्यामुळे अमरावती शहरात पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या वतीने वीना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मोहीम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत आहे.
शहरात ज्या ठिकाणी चौकात गर्दी होते त्याठिकाणी विना मास्क लोकांनवर 500 रुपये प्रमाणे कारवाई करण्यात येत आहे,यामध्ये महानगर पालिका,पोलिस विभाग,महसूल विभाग है संयुक्त विद्यमाने कारवाही करत आहे. तर लोकांनी घराबाहेर निघतांना मास्कच वापर करावा,सोशल डिस्टन पाळावे असे आवाहन मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले आहे