अन्न नाही,चारा नाही,ना उरला निवारा…लाखांदूर तालुका पूर परिस्थिती विशेष…

लाखांदूर – नास्यिक लांडगे

गत 28 ऑगष्ट रोजी लाखांदूर तालुक्यातील चूलबंद व वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठावरील व लगतच्या गावांचे बेसुमार नुकसान झाले.पुरामुळे शेतात लागवडीखालील धान ,भाजीपाला यासह अन्य पिके गाळाच्या थरांनी बुजल्याने हिरवीगार दिसणारी शेती व रान गाळमय होउन उजाड झाल्याने अन्न व गुरांच्या चा-याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

गावात पुराचे पाणी शिरुन अनेक कुटूंब स्थलांतरीत होतांनाच शेकडो घरांची पडझड होउन शेकडो कुटूंब बेघर झाल्याने निवा-याचा प्रश्न पडतांना अन्न नाही,चारा नाही,ना उरला निवारा ही समस्या प्रत्यक्ष पुराने बाधित गावांना भेट देत ऐकतांना क्षणभर मन स्तब्ध होत असल्याचे वास्तव आहे.

लाखांदूर तालुक्यातील दोन्ही नद्यांना पूर आल्याने तालुक्यातील जवळपास 30ते 35गावे प्रभावित झाली आहेत.नदीकाठावरील व लगतच्या पुराने प्रभावित गावातील धानासह अन्य पिक शेती पुर्णत:नष्ट होतांना मोठ्या प्रमाणात घरांची पडझड व अनेक कुटूंब घरात पाणी शिरल्याने स्थलांतरीत झाले आहेत.नदीकाठावरील गावात व शेतशिवारात पुर ओसरताना सर्वत्र गाळ दिसून येत आहे.

परिणामी पाळीव गुरे-जनावरांच्या चा-याचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे.शेतीपिक घेण्यासाठी अनेक शेतक-यांनी नविन पिककर्जे घेउन पिकांची लागवड केली.मात्र पुरामुळे पुर्णत:शेती नष्ट झाल्याने पिक कर्जाचा भरणा कसा करावा?असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे.एकुणच पुरामुळे पिकशेती पुर्णत:नष्ट होणे,घरांची पडझड होउन अनेक कुटूंब बेघर व स्थलांतरीत होणे आदि सर्व बाबींनी सबंध पूरग्रस्त भागात नैराश्य व दु:खाचे वातावरण दिसत आहे.

दरम्यान या पुरग्रस्ताना शासन मदत मिळण्यासाठी सारेजण धावून आले असले तरी शेतीसह अन्य हानीसाठी दिली जाणारी शासन मदत पुरेशी आहे काय? असा देखील प्रश्न केला जात आहे.एकरी 20हजार पिक कर्जाची उचल करना-या शेतक-याला नुकसान भरपाई म्हणून एकरी 7 हजाराची शासन मदत दिली जात असेल तर कुटूंब पोषण व कर्जाचा भरणा कसा करावा?

तात्पुरती दिली जाणारी मदत पुरेशी आहे काय?अथवा या बाधित क्षेत्रासाठी शासनाच्या विशेष पँकेजची गरज आहे असाच सवाल सर्वत्र केला जात आहे.तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पुराने इटान ते सोनी/आवळी पर्यंत एकुण 13गावे व चूलबंद नदीवरील खैरी/पट ते खोलमारा-तई पर्यंतची जवळपास 20गावे पुराने बाधित होउन या गावात पुर्णत: पिकशेती व घरांची पडझड निराश्रीत झालेल्या कुटुंबात अन्न नाही,चारा नाही,ना उरला निवारा हे सांगण्याखेरीज काहीही शिल्लक नाही हे विशेष.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here