भंडारा उपवनसंरक्षक म्हणून भलावी तर एफडीसीएमला नितीनकुमार… सोमवारला स्वीकारणार पदभार…

भंडारा : भारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या पदोन्नती तथा बदली पदस्थपणा झाल्या आहेत. यात भंडाराचे उपवनसंरक्षक म्हणून एस. बी. भलावी हे रुजू होत आहे. तर भंडारा एफडीसीएमच्या विभागीय व्यवस्थापकपदी नितीनकुमार यांची वर्णी लागली आहे. हे दोन्ही वनाधिकारी सोमवारला पदभार स्वीकारणार आहेत.

महसूल व वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक (मंत्रालय) अरविंद आपटे यांनी या बदली तथा पदस्थापनेचा १ ऑक्टोबरला आदेश बजावले आहे. भंडाऱ्याचे तत्कालीन उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांची खान्देशात बदली झाल्यापासून येथील पद रिक्त होते. या पदाचा अतिरिक्त प्रभार सहायक वनसंरक्षक नागुलवार यांच्याकडे सोपविण्यात आला होता. भलावी यांची पदस्थापणा भंडारा येथे करण्यात आल्याने रिक्त जागा भरली जाणार आहे.

भलावी हे नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील वरघाट (पवनी) येथील आहेत. त्यांचे शिक्षण भंडारा येथील लालबहादुर शास्त्री विद्यालय झाले आहे. भलावी यांनी यापूर्वी भंडारा जिल्ह्यातील साकोली व तुमसर यांनी वनसेवा केली आहे. तर काहीकाळ ते भंडारा वनसंरक्षक म्हणून कार्यकाळ सांभाळला आहे.

श्री भलावी यांनी भंडारा आणी गोंदिया जिल्ह्यातील वनविभागात सुमारे १७ वर्षे विविध पदांवर राहून वनसेवा केली आहे. त्यामुळे श्री भलावी यांना भंडारा जिल्ह्यातील वनांचा पूर्ण अभ्यास असल्याने येथे पदभार स्वीकारल्यावर त्यांना कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. श्री भलावी हे फेब्रूवारी २०२२ ला वनसेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्र वनविकास महामंडळच्या
(एफडीसीएमच्या) रिक्त असलेल्या भंडारा येथील विभागीय व्यवस्थापक हे पद रिक्त होते. या जागी नितीनकुमार यांची पदस्थपणा करण्यात आली आहे. नितीनकुमार हे पूर्व नाशिक येथील (अधिसंख्या) येथे सहायक वनसंरक्षक म्हणून कार्यरत आहे. भंडारा येथील सहायक वनसंरक्षक (अधिसंख्या) दीपक मल्होत्रा यांची ब्रम्हपुरीचे उपवनसंरक्षक म्हणून बदली झाली आहे.

श्री भलावी हे वनसेवेच्या मिळालेल्या उर्वरित कालावधीत ते भंडारा जिल्ह्यातील वनसृष्टीचा कायापालट करतील आणि वनकर्मचाऱ्यांच्या हिताची जोपासना करून सर्वांना सोबत घेऊन वनसेवा करतील, अशी अपेक्षा महाराष्ट्र सेवानिवृत्त वनअधिकारी, कर्मचारी संघटनेचे केंद्रीय सदस्य विजय मेहर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here