नऊ एकरातील धान शेतीचे झाले वाळवंट…इटान येथील घटना

लाखांदूर:– ऑगस्ट महिन्यात वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील इटान गाव पूर्णतः पुराच्या विळख्यात सापडतांना संपूर्ण धान शेती पाण्याखाली आली होती. तब्बल तीन दिवसांनी गावातील व शेतशिवारातील पूर् ओसरताना पुराने वाहून आलेली वाळू शेतात जमा झाल्याने चक्क नऊ एकरातील धान शेती वाळवंट झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

विलास चाचेरे(35)रा.इटान असे पिडीत शेतक-याचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार गत आगस्ट महिन्याच्या अखेरीस लाखांदूर तालुक्यातील वैनगंगा व चुलबंद या नद्यांना पूर आला होता. या पुरामुळे लाखांदूर तालुक्यातील नदी काठावरील सर्वच गावे बाधित झाले होते. सदर गावे पुराने बाधित होताना नदीकाठावरील गावातील सर्व पीक शेती नष्ट होऊन शेकडो घरांची पडझड व अनेक कुटुंबे स्थलांतरित देखील झाले होते.

तब्बल तीन ते चार दिवसानंतर या नद्यांचा पूर् ओसरताना सबंध गावात व शेत शिवारात पुराने वाहून आलेली वाळू व गाढ जमा झाल्याचे दिसून येत आहे. दरम्यान इटान येथील विलास चाचेरे नामक शेतकऱ्याच्या नऊ एकर शेतीतील उभे धानपीक पुरामुळे नष्ट होऊन शेतात वाळूचे ढीग जमा झाल्याचे वास्तव आहे. शेतात वाळूचे ढीग जमा झाल्याने बारमाही उत्पादनाची शेती वाळवंट झाल्याचे बोलले जात आहे.

सदर शेती ची पीक योग्य अवस्थेसाठी मशागत करतानादेखील शेतकऱ्याला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली जात आहे.एकंदरीत पुरामुळे सबंध पीक शेती नष्ट झाल्याने उत्पादना विना विविध पीक कर्जाच्या बोजाखाली वावरणाऱ्या या शेतकऱ्याला पिक योग्य शेती निर्मितीसाठी नुकसान भरपाई सह शासन मदतीची गरज असल्याचे समस्त गावकऱ्यांनी सांगितले.

याप्रकरणी शासनाने तात्काळ दखल घेऊन नऊ एकरातील धान शेती चे वाळवंट झालेल्या शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई देण्यासह पिक योग्य शेती मशागतीसाठी आर्थिक मदत करावी अशी मागणी पीडित शेतकऱ्यांने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here