निंबा फाटा परिसरातील आजचा दिवस शेतकऱ्यांना लाभलेल्या हवामान अंदाजका सोबत…

अकोला – अमोल साबळे

आज निंबाफाटा येथे प्रसिद्ध हवामान अंदाजक श्री. पंजाब पाटील डख यांनी अंत्री येथील शेतकर्याच्या विनंती ला मान देवून लक्ष्मी हाॅस्पिटल भेट दिली. डाॅ.पंकज साबळे यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. परीसरातून या ठीकाणी आलेल्या शेतकर्यासोबत पाऊस, शेती व हवामान अंदाज या विषयावर पंजाब पाटील डख यांनी सविस्तर चर्चा केली. यावेळी शेतकर्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

प्रास्ताविकात जनार्दन साबळे यांनी साहेबांचे अंदाज शेतकर्याना खुप तारणारे असून अचूक असल्याचे सांगितले. कार्यक्रमाला सधन शेतकरी उमेशभाऊ जाधव ,अंत्री चे सरपंच संदिप वाघोळे, कवठा येथील मा.सरपंच दिलीप पा.चव्हाण, भा.ज.पा.तालूका अध्यक्ष अमोल साबळे, नानासाहेब देशमुख, कैलाससेठ राठी,विनील मामनकर,

नंदकीशोर सुरे, पंकज देशमुख,शंकरराव शर्मा रोहीत चवरे ,राजूभाऊ ठोकणे ,संजय देशमुख, संदिपलाला साबळे,गणेश कदम, बाप्पूराव देशमुख, पत्रकार विलास बोरचाटे, पत्रकार कर्हे तथा निंबाफाटा परीसरातील शेतकरी उपस्थित होते. लालाजी हाॅटेल ला भेट देवून हवामान अंदाजक श्री.पंजाब पाटील डख पुढील मनब्दा येथील शेतकर्याच्या भेटी साठी रवाना झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here