5% निधी ग्राम सचिवाने दिव्यांगाच्या बँक खाते पुस्तकांमध्ये तात्काळ जमा करण्यात यावा…

खेट्री येथील दिव्यांग व्यक्तींचे गट विकास अधिकारी पातुर यांना निवेदन…

पातूर – निशांत गवई

पातुर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दिव्यांग व्यक्ती चा निधी सन 2015 ते सन 2021 पर्यंतचा निधी बँक खाते पुस्तकांमध्ये जमा करण्यात यावा अशी मागणी करणारे निवेदन येथील दिव्यांग व्यक्तींना पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना 15 नोव्हेंबर रोजी एक लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे.

या निवेदनामध्ये येथील सचिव यादीत ताले सरपंच रेश्माबी अब्दुल शमीम या दोघांना दिव्यांग व्यक्ती नी 3 नोव्हेंबरला कॉल करून विचारले की उद्या दिवाळी आहे अजून नागपूर निधी आलेला नाही तर त्यांनी सामानाचे जीएसटी 1 हजार रुपयांचे बिल आणावयास सांगितले जीएसटी चे बिल आणायला सांगितल्याने दिव्यांग व्यक्तींनी स्पष्ट नकार देऊन कोणीच आणत नाही तुम्ही आमच्या बँक खाते पुस्तकात निधी जमा करावे तर त्यांनी आम्हाला सांगितले की पैसे जमा करत नाही एक हजार रुपये सी जीएसटी बील आना नंतर पैसे जमा करू त्यानंतर आम्ही तक्रार करतो असे म्हटले तर.

त्यांनी आमच्यातील दिव्यांग शेख हुसेन शेख चांद या व्यक्तीला कॉल करून म्हटले की दोन हजार रुपयाचे जीएसटी बिल आना मग निधी खात्यात जमा करू त्यानंतर सहा नोव्हेंबरला कॉल करून विचारले साहेब तुम्ही आधी 1000 म्हणत होते आता दोन हजार रुपयाचे कसे झाले त्यांनी मला सांगितले की हा दुसरा निधी आहे आणि मागील वर्षी एकच निधी वाटप केला.

यावर्षी दोन वाटप करायचे आहेत असे त्यांनी दिव्यांग व्यक्तीला सांगितले त्यानंतर 9 नोव्हेंबर रोजी दिव्यांग व्यक्तींनी सचिवाला निवेदन दिले सन 2015 ते 2021 पर्यंत दिव्यांगाच्या पाच टक्के निधी खात्यात जमा करण्यात यावा तसेच बोगस प्रमाणपत्र घेऊन लाभ घेणाऱ्या ची चौकशी करावी त्याचबरोबर वीस लाख लोकांना प्रत्येकी एक हजार रुपये निधी मिळाला तो पूर्ण आहे तो सुद्धा पुर्ण मिळावा असे निवेदन दिले होते मात्र जीएसटी चे बिल आणण्यासाठी त्यांना नोटीस पाठविण्यात आले 2020ला 36 लोकांना निधी वाटप केला मग यावर्षी 24 लोकांना नोटीस पाठविली काय करावे.?

असा प्रश्न त्यांचेत असून त्यांनी याबाबत सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी यावेळी केली आहे पातुर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी राहुल शेळके यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये नितीन डहाळे, महादेव पदमने , हमीद बेग अमजद बेग, महादेव मावळे, गजानन ढहाळे ,रामदास मोकळकर, जगदेव उपर्वट, सुभाष जाधव , नंदू आप्पा ढमगाळे, शेख अफजल, शेख हुसेन शेख चांद ,अब्‍दुल फयूम शेख बिस्मिल्ला यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here