राज्यात आजपासून नवे निर्बंध लागू…काय सुरु काय बंद…

न्यूज डेस्क – राज्यात कोरोनाच्या डेल्टा प्लस विषाणूचा वाढता धोका लक्षात घेता राज्य सरकारने आज सोमवार 28 जून 2021 पासून पुन्हा एकदा कठोर निर्बंध लागू कऱण्याचा निर्णय घेतला आहे. संभाव्य तिसरी लाट येण्याचा धोका लक्षात घेता राज्य सरकारने प्रतिबंधात्मक सूचना आणि नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार ‘ब्रेक द चेन’अंतर्गत 4 जून 2021 पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधात विस्तार करण्यात आला आहे.

जमावाची व्याख्या ‘एका सामूहिक कारणासाठी पाच पेक्षा जास्त लोकांचे एकत्रित येणे’ अशी करण्यात आली आहे. यामध्ये लग्न समारंभ, पार्टी, निवडणुका, प्रचार, सोसायटी बैठका, धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम, क्रीडा सामने, सामाजिक कार्यक्रम यांचा अंतर्भाव असेल. यामध्ये काही अस्पष्टता असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील. सदर मार्गदर्शक तत्त्वे अशा अन्य जमवासाठीही लागू पडेल की ज्याचा इथे उल्लेख करण्यात आलेला नाही.

आपत्ती म्हणून कोविड-19 जोपर्यंत अस्तित्वात असेल, तोपर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पूर्णपणे बंदी असेल. फक्त स्थानिक प्रशासन आणि वैधानिक स्वरूपाच्या जमावाला यातून सूट असेल.

राज्यातील अनेक जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या स्तरातून तिसऱ्या स्तरात करण्यात आला आहे. या ठिकाणी सर्व दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त इतर वस्तूंचा व्यवहार करणाऱ्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील. मॉल्स, सिनेमागृह, मल्टिप्लेक्स बंद राहणार आहेत. रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार 50 टक्के क्षमतेने सायंकाळी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील.

पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्रित येऊ नये

बांधकाम होत असलेल्या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यांपेक्षा जास्त संख्येने काम करता येणार नाही.

खुल्या जागेच्या ठिकाणीही क्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त लोकांना काम करता येणार नाही.

कोणत्याही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त असू शकणार नाही.

एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी संमेलने होत असतील तर तिथे कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण केलेले असावे किंवा त्यांच्या नियतकालिक चाचण्या आवश्यक असतील.

संमेलन अथवा मेळावे होत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी सादर केलेले एसओपीचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य आहे.

हॉटेलमधील उपहारगृहे हे त्या ठिकाणी राहणाऱ्या पाहुण्यांसाठी मर्यादित असेल. तेही क्षमतेच्या 50 टक्के अटींवर आणि सर्व एसओपी यांचा पालन करुन. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी लागू असलेल्या निर्बंधांचा पालन करून सेवा देता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here