“सुरज फौंडेशन संचलित, नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये” १४ नोहेंबर, बाल दिन उत्साहात साजरा…

सांगली – ज्योती मोरे

नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जयंती ही बाल दिन म्हणुन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सौ. प्रमिला प्रकाश खोलकुंबे (यशस्वी उद्योजिका), शाळेचे मुख्याध्यापक मा.श्री.अधिकराव पवार सर , सौ. केतकी खोलकुंबे उपस्थित होते. सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आला.

या नंतर शाळेतील काही विद्यार्थ्यांनी पंडित नेहरू यांच्या जीवन कार्याबद्दल भाषणे केली. शाळेतील सहाय्यक शिक्षिका सौ. अमृता चव्हाण आपले मनोगत व्यक्त करताना बोलल्या की पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान, स्वतंत्र भारताच्या चळवळीतील अग्रणी नेते,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोकप्रिय नेते म्हणून ओळखले जायचे. नेहरूंना लहान मुले खुप आवडायची. नेहरूंचा जन्म काश्मिरी पंडितांच्या घरी १४ नोव्हेंबर १८८९ साली झाला.

नेहरूनी त्यांचे शिक्षण इंग्लंड या देशांमध्ये पूर्ण केले. १९१२ मध्ये भारतात परतल्यावर राजकारणामध्ये सक्रिय सहभागी झाले. १९३६-१९३७ यावर्षी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. ‘इंदिरेस पत्र, भारताचा शोध’ इत्यादी सारखे त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. २०१२ मध्ये झालेले आऊटलूक इंडियाच्या “द दी ग्रेटेस्ट इंडियन”या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणा मध्ये नेहरू चौथ्या क्रमांकावर होते.

बालदिनाचे औचित्य साधून अभ्यास गट्(बालवाडी) ते इयत्ता ४ थी च्या विद्यार्थ्यांची वेशभूषा स्पर्धा व इयत्ता पाचवी तें आठवी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता पाचवी तें आठवी सहभागी विद्यार्थी नावे चीं.अजिंक्य वलेकर, अनिरुद्ध तारळेकर, सृष्टी बगनकर, मानतुंग गौडाजे, अन्वी चौडाज, तसेच इयत्ता १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्याची वर्ग सजावट स्पर्धा घेण्यात आली. वेशभुषा स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता.

वेशभूषा स्पर्धेमध्ये भाग घेतलेले विद्यार्थी सावित्रीबाई फुले, जिजाबाई, झाशीची राणी, छत्रपती शिवाजी महाराज, राधा, शेतकरी , शिक्षक, फॉरेनर, यासारख्या विविध वेशभूषेत आले होते. कोरोना च्या काळात ज्यांनी आपले कर्तव्य काटेकोरपणे पार पाडले असे कोरोना योद्धे म्हणजे डॉक्टर, सफाई कामगार, परिचारिका, आरोग्य अधीक्षक, पोलीस , ट्राफिक हवालदार इत्यादींच्या वेशभूषेत सहभागी झाले होते.

वेशभूषा स्पर्धेचा निकाल अभ्यास (बालवाडी) प्रथम -श्रेयस रोहित कोळेकर. द्वितीय -निकेत प्रणील खोलकुंबे. तृतीय- सई उत्तमराव जाधव. इयत्ता पहिली ते चौथी प्रथम -अनिरुद्ध सुनिल खोत. द्वितीय- श्रीतेज हणमंत पाटील. तृतीय -संस्कृती संदीप भोसले. प्रमुख पाहुण्या सौ. प्रमिला प्रकाश खोलकुंबे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की मला या शाळेबद्दल खूप आदर आणि अभिमान आहे.

कारण या शाळेमध्ये माझी मुले शिकलेली आहेत तसेच आत्ता माझा नातू शिक्षण घेत आहे. शाळेमध्ये नेहमीच मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात . विद्यार्थ्यांनी देखील खूप शिकून कर्तृत्वसंपन्न होऊन आपल्या शाळेचे नाव उज्वल करावे. मुलांनी देखील आपले शिक्षक ,आई-वडील, वडीलधाऱ्या व्यक्ती यांचे मार्गदर्शन घेऊन आपल्या भावी आयुष्याची यशस्वी वाटचाल करावी.

वेशभूषा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी केलेला अभिनय केलेले पोशाख कौतुकास्पद होते.शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवार बोलताना म्हणाले की विचाराधिन व्यक्ती, उभे राहिले तर फौजी, राजकारणातील आदरणीय व्यक्तीमहत्व म्हणून ओळखले जाणारे पंडीत जवाहर लाल नेहरु.

छोटया उद्योगातून मोठा उद्योगाना स्फूर्ती देणाऱ्या यशस्वी महिला उद्योजका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या व आपल्या कर्तृत्वातून आधुनिक महिलांना स्व कार्यातूनप्रेरणा देणाऱ्या प्रमुख पाहुण्या सौ प्रमिला प्रकाश खोलकुंबे. यांनी शाळेच्या कामाबद्दल जे गौरवोद्गार काढले त्याबद्दल त्यांचे आभार.मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि व्यक्तिमत्वासाठी शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम घेतले जातात.

वेशभूषा स्पर्धा मधील सहभागी झालेले विद्यार्थी त्याचे स्वतःचे नाव विसरून वेशभूषेचे नाव सांगत होते यावरूनच त्यांच्या अंगी असलेला ध्येय वेडेपणा हा बालवयापासूनच दिसून येत आहे . यावरूनच त्यांनी परिधान केलेल्या वेशभूषा स्पर्धेमधून थोर नेत्यांची, समाज सुधारकांची, समाजसेवकांची त्यांच्या कार्याची मुलांना माहिती होते.
शाळेमध्ये येणारा प्रत्येक विद्यार्थी हा शाळेत येत असताना हसतच शाळेत येतो.

शाळेच्या भिंतीवर लावलेले थोर नेत्यांचे फोटो हे फक्त ते पाहण्या पुरते नसून त्यांच्या पाऊल खुणांवरून स्वयंप्रेरित होऊन कर्तव्यतत्पर होण्यासाठी असते हे आमची शाळा विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार करून त्यांच्या अंगी आत्मसात करण्याचा प्रयत्न करत असते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. विनीता रावळ यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ. प्रतिभा राजपूत यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here