सुरज फौंडेशन संचलित नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी मध्ये २६ नोव्हेंबर ‘संविधान दिन’ उत्साहात साजरा…

सांगली – ज्योती मोरे

नव कृष्णा व्हॅली स्कूल मराठी माध्यम मध्ये 26 नोव्हेंबर म्हणजे ‘संविधान दिन’ उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री. अधिकराव पवार सर उपस्थित होते.सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांच्या कडून सामूहिकपणे संविधान वाचन घेण्यात आले.

26 नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन याचे औचित्य साधून माझे संविधान माझा अभिमान या उपक्रमांतर्गत शाळेमध्ये वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, पोस्टर प्रदर्शन , चित्रकला स्पर्धा इत्यादी आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

वक्तृत्व स्पर्धेमधील विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे.- कु.प्रमोद मारुती गुरव.( इयत्ता ९वी), कु.श्रेयांक राहुल पाटील.(इयत्ता ३ री), कु.प्राची प्रकाश चव्हाण.(इयत्ता ५वी), कु.संघर्ष सुभाष वावरे. (इयत्ता ५वी), कु.इशिता रुपेश पाटील. (इयत्ता ५वी). इतर विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

निबंध स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांची नावे; कु. अथर्व यादव (इयत्ता ९वी), कु. सुजल चंदनशिवे(इयत्ता९वी), कु.प्रमोद गुरव(इयत्ता९वी), कु. दर्शन हंकारे( इयत्ता ९वी).
चित्रकला स्पर्धा व प्रदर्शन स्पर्धा यामधील सहभागी विद्यार्थ्यांचे नावे पुढील प्रमाणे; कु. सक्षम कानवाडे. (इयत्ता ४ थी), कु. भार्गवी कांबळे(इयत्ता ४ थी),कु. आर्या परीट(इयत्ता ४ थी), कु. अनिरुद्ध खोत (इयत्ता ४ थी), कु. विषालअक्षी गरडे(इयत्ता ९वी),

कु. अंजली निषाद (इयत्ता ९वी),कु. व्यंकटेश मालगावे (इयत्ता ९वी).घोषवाक्य स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थी कु.तनुजा खताळ (इयत्ता ६वी) शाळेतील सहाय्यक शिक्षिका कु. प्रियंका हेरवाडे मॅडम आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, “२६ नोव्हेंबर म्हणजे संविधान दिन आपण का साजरा करतो, त्याचे महत्त्व,त्यातील कलमे, त्याचे महत्व इत्यादी विषयी माहिती सांगितली.”

शालेय स्पर्धांमध्ये एखादा निबंध लिहायचा तर आपल्याला खूप विचार करावा लागतो तर एका देशाचे संविधान लिहायचं त्याच्यावर आधारित देशातील संपूर्ण कायदे करायचे हे देखिल खूपच अवघड काम आहे. संविधान घटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना हे संविधान लिहिताना २ वर्ष, ११ महिने, 1८ दिवस इतका कालावधी लागला होता.

सर्वप्रथम पंडित नेहरू यांनी भारतीय संविधान ची प्रत इंग्रजी मध्ये रूपांतरित केली गेली . भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे आणि एकमेव हस्तलिखित संविधान म्हणून ओळखले जाते.संविधान हे शाळेत पाठ करण्यापुरते नसून त्यातील असलेली बंधुता ,स्वातंत्र्य, अभिव्यक्ती, एकात्मता इत्यादी कलमे अंगीं आत्मसात करून ती आचरणात आणणे देखील आवश्यक आहे.

शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री अधिकराव पवार सर आपले मनोगत व्यक्त करताना बोलले . अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेद्वारे स्वीकारले आणि संविधान संपूर्ण रूपाने २६ जानेवारी १९५० रोजी लागू करण्यात आली.भारतीय संविधान ही जगातील सर्वात मोठे संविधान, लवचिक व ताठर राज्यघटना म्हणून ओळखली जाते. शाळेत देखील देशाचे संविधान हे पाठ असावे इतकेच नव्हे तर त्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ माहीत असणे देखील गरजेचे आहे.

संविधान दिन शाळेत साजरा करणे म्हणजे भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या संविधानातील कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवण्याचा उद्देश असतो. सुरुवातीला संविधानामध्ये ३९५ कलमांची नोंद होती त्यात वाढ करून आता ४४८ कलमांची नोंद करण्यात आली. कलम३४३ अन्वये देवनागरी लिपीत लिहिलेली हिंदी भाषा अधिकृत भाषा आणि राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आली.

तसेच इतर ही २२ भाषांना मान्यता प्राप्त झाली .कलम नंबर ४५ या कलमाच्या आधारे १४ वर्षाखालील सर्व बालकांना मोफत शिक्षण दिले गेले याची नोंद आहे. संविधान विसंगत कायदे करण्याचा अधिकार कोणालाही नाही. देशातील प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार, समान हक्क, आणि व्यक्तिस्वातंत्र्य मिळाले आहेत. संविधाना प्रमाणे दिलेले कायदे आत्मसात करून अंगीकृत करून त्यानुसार आपले जीवन व्यतीत करावे.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेतल्या गेलेल्या इयत्ता ८ वी शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांची नावे
१) कुमारी -अनुष्का राजेंद्र चिंबळकर.(३०० पैकी २२०)
२) कुमारी -समृद्धी रविंद्र कांबळे. (३००पैकी १६६)
३) प्रणोती राजेंद्रसिंग राजपूत.(३०० पैकी १५४).

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेतल्या गेलेल्या टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षा अंतर्गत इंग्रजी, गणित, विज्ञान विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणपत्रक देऊन सत्कार करण्यात आला. २६ नोव्हेंबर रोजी मुंबई येथे अतिरेक्यांनी जो भ्याड हल्ला करण्यात आला त्या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मौन पाळून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.

आपल्या देशासाठी अतिरेक्यांना बरोबर झुंज करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे अशोक कामटे, तुकाराम ओंबळे ,विजय साळसकर, संदीप उन्नीकृष्णन ,हेमंत करकरे यांना देशाच्या संरक्षणासाठी वीर मरण प्राप्त झाले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here