नांदेड – महेंद्र गायकवाड
नांदेडमध्ये पोलिसांच्या नाकावर टिच्चून गुंडांनी पुन्हा एकदा भरदिवसा जुना मोंढा भागातील तीनहून अधिक व्यापाऱ्यांना लुटल्याची चर्चा होत आहे.एका पानपट्टी चालकाला खंजीरने भोसकल्याचे सांगितले जाते. जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून नूतन जिल्हा पोलीस अधीक्षकानी कारभार घेताच गुन्हेगारानी पुन्हा तोंड वरी काढले असून नांदेड शहर व परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नांदेड जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास नांदेड पोलिस सक्षम आहेत असा दावा नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी नुकताच केला होता.शेवाळे यांचा हा दावा अवघ्या चार दिवसात गुंडाने धुळीस मिळवला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या आणि नांदेड पोलिसांच्या नाकावर टिच्चून जुना मोंढा भागातील व्यापाऱ्यांना रिव्हॉल्वर चा धाक दाखवून लुटण्यात आले. एवढेच नाही तर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत सिनेमाच्या कथानका प्रमाणे या भागात व्यापाऱ्यांना लुटण्यात आले.
गुंडांनी जुना मोंढा परिसरात हैदोस घातला असतानाही नांदेड पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखा काय करत होती असा सवाल आता उपस्थित केला जात आहे . भर दिवसा व्यापाऱ्यांवर गोळ्या झाडून लुटमार होत असल्याने नांदेडमध्ये पुन्हा एकदा व्यापाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
रविवारी जुन्या मोंढा भागात गुंडांनी गोळीबार करीत हैदोस माजविला असून येथील व्यापाऱ्यांत दहशतीचे वातावरण निर्माण करून विजयलक्ष्मी ट्रेडर या कापड दुकानातील गल्यातील दहा हजार रुपये हिसकावले व गोळीबार करून हे गुंड दहशत निर्माण करून पसार झाले.नांदेड शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून दरम्यान घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत.