नागपूर जिल्ह्यात विक्रमी ७,२०१ नविन कोरोना बाधित रुग्णांची भर..६३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू..३,२४० कोरोनामुक्त…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर जिल्ह्यात आज रविवार दि.११/०४/२०२१ रोजी २६,००७ जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली. यामध्ये ७२०१ नविन कोरोना बाधित रुग्ण आढळले असून, शहरातील ४६४१ व २,५५३ व बाहेरील ७ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील ३६, ग्रामीण क्षेत्रातील २० व बाहेरील ७ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ३,२४० रुग्ण कोरोनामुक्त झाले असून यामध्ये शहरातील २,३०९ व ग्रामीण क्षेत्रातील ‌९३१ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ५५,४७४ रुग्ण उपचाराधीन आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here