नागपूर जिल्ह्यात ८९ नविन कोरोना बाधित रुग्णांची भर… ७ कोरोना बाधित रूग्णांचा मुत्यू…१९१ बाधित रुग्ण कोरोनामुक्त..‌.

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर जिल्ह्यात शुक्रवार दि.११/६/२०२१ रोजी १२,२९० जणांची कोरोनाची तपासणी करण्यात आली यामध्ये ८९ कोरोना बाधित रुग्ण आढळले असून शहरातील ५० व ग्रामीण क्षेत्रातील ३७ व बाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात ७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून शहरातील २ ग्रामीण क्षेत्रातील ३ व बाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे.

नागपूर जिल्ह्यात १९१ कोरोना बाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असून शहरातील १५२ व ग्रामीण क्षेत्रातील ३९ रुग्णांचा समावेश आहे.जिल्ह्यात २,३४७ रूग्ण उपचाराधीन असून शहरातील १,९१२ व ग्रामीण क्षेत्रातील ३३५ रुग्णांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here