बेलदा येथे नेहरू युवा केंद्र तर्फे १२५ वी सुभाष चंद्र बोस जयंती साजरी…

रामटेक – राजु कापसे

नेहरू युवा केंद्र क्रीडा व खेल मंत्रालय भारत सरकार च्या वतीने ठिकठिकाणी सुभाष चंद्र बोस जयंती प्राक्रम दिवस मनून वेगवेगळ्या ठिकाणी साजरी करण्यात आली
बेलदा येथे सुभाष चंद्र बोस युवक मंडळ बेलदा व नेहरू युवा केंद्र तर्फे नेताजीच्या प्रतिमेला माल्यारपण करून साजरी करण्यात आली या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्याच देशासाठी अमूल्य योगदान यांच्या बाबद उपस्थित युवकांना मार्गदर्शन केलं.

या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष मनून बेलदा येथील सरपंच उमेश भांडारकर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री निळकंठराव चव्हाण सर, शासकीय माध्यमिक विद्यालय येथील प्राचार्य श्री सुरेश बळी सर. उपसरपंच द्रोपती वरखडे.

सामाजिक कार्यकर्ते श्री बलिरमाजी कालोकार, नेहरू युवा केंद्राचे श्री कृष्णा भाल उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष चंद्र बोस युवक मंडळाचे आकाश चावरे राकेश भांडारकर गणेश ताले सचिन खरोले राहुल कुंभारकर राजेंद्र वरखडे विठल भाल संतोष चावरे वैष्णव भाल रजत हर डे अर्णव अस्वले यांनी सहकार्य केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here