मोंटो कार्लो रोड कंपनीच्या निष्काळजीपणा मुळे तरुण मजुराचा मृत्यू, स्थानिकांचा आरोप…

पातूर – निशांत गवई

सुरक्षा संदर्भात सर्व नियम धाब्यावर बसवणाऱ्या कंपनीच्या निष्काळजीपणामुळे बिहारच्या 36 वर्षीय तरुण मजुराचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहे. पातुर बाळापुर रोडवरील डॉ. वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या जवळून पातुर शहराबाहेरून वळण घेऊन जाणारया,

अकोला मेडशी महामार्गाच्या बायपास उड्डाणपुलाच्या पिल्लर निर्मितीच्या कामावर बिहारच्या राकेश रामराज गोंड राहणार बिशुनपुरा, शिवान, जगदीशपूर कोठी वय 36 वर्ष या तरुण मजुराचा मातीच्या ढिगाऱ्याखाली दबुन मृत्यू झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी सहकारी मजुरांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितली.

पिल्लर निर्मिती करत असताना बाजूलाच काम करणाऱ्या पोकलँड मशीन मुळे सदर मातीचा ढिगारा घसरला त्यामध्ये सदर मजुराचा मृत्यू झाल्याची ची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली मात्र या ठिकाणी मोंटो कार्लो कंपनीने निष्काळजीपणा केला त्यामुळेच सदर मजुराचा मृत्यू झाला अशी माहिती समोर येत आहे.

मातीखाली दबलेल्या मृतदेह चक्क पोकलांड काढण्याच्या प्रयत्नात मृतदेहाच्या डोक्यावर चेहऱ्यावर मानेवर खोल जखमा असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. त्यामुळे सदर कंपनीवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी समोर येत आहे.

घटनेची माहिती प्राप्त होताच पातुर चे तहसीलदार दीपक बाजड पोलीस निरीक्षक हरीश गवळी आणि पातुर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सोनाली यादव यांनी घटनास्थळावर धाव घेतली.वृत्तसंकलन करण्याकरिता गेलेल्या प्रस्तुत प्रतिनिधीला घटनास्थळी माहिती घेण्यासाठी अटकाव केला जात होता त्यामुळे सदर कंपनी च्या कार्यपद्धतीबद्दल सखोल चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

अकोला मेडशी महामार्गाचे काम सुरू झाले तेव्हापासूनच मोंटो कार्लो कंपनी शासकीय नियमांची पायमल्ली करून कामकाज करीत असल्याचे अनेक उदाहरणे समोर आले त्यासंदर्भात जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी आणि तहसिल स्तरावर अनेक तक्रारी करण्यात आल्या मात्र याकडे डोळेझाक का करण्यात आली हा संशोधनाचा विषय आहे.मजुराच्या मृत्यूप्रकरणी पातूर पोलिसांनी मर्ग दाखल केला असल्याची माहिती समोर येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here