ई-लिलावात नीरज चोप्राचा भाला गेला एक कोटीच्या पार…’या’ खेळाडूंच्या रॅकेटची बोली १० कोटी…

फोटो- सोशल मिडिया Twitter

न्यूज डेस्क – गेल्या दोन वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तू आणि स्मृतीचिन्हांचे संस्कृती मंत्रालय ई-लिलाव करत आहे. यासाठी आजपासून म्हणजेच शुक्रवारपासून बोली सुरू झाली आहे. टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमधील खेळाडूंचे ग्लोब, रॅकेट आणि इतर वस्तू देखील या ई-लिलावात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.

लिलावात खरेदी केलेले खेळाडूंची उपकरणे हातोहात मिळत आहेत. यावेळी टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रथमच पात्र ठरलेल्या भवानी देवीची तलवारबाजी, पॅरा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता कृष्णा नगर आणि रौप्य पदक विजेता सुहास एलवाय यांचे रॅकेट 10-10 कोटींवर पोहोचले आहे.

त्याचबरोबर भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रा यांच्या भाल्याची बोली 1 कोटी 20 लाखांवर पोहोचले आहे. बॉक्सर लोव्हलिनाच्या बॉक्सिंग ग्लोबनेही 1 कोटी 80 लाखांचा टप्पा पार केला आहे. सुमीत अँटिलच्या भाल्याची बोली एक कोटीपर्यंत पोहोचली आहे आणि खेळाडूंच्या ऑटोग्राफ फ्रेम देखील एक कोटीवर पोहोचली आहेत.

आज 17 सप्टेंबरपासून सुरू झालेला ई-लिलाव 7 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटवस्तू, स्मृतिचिन्ह, जॅकेट आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. लिलावात 2700 पेक्षा जास्त वस्तूंचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे.

लिलावातून मिळालेली रक्कम नमामी गंगे मिशनसाठी वापरली जाईल. 2019 मध्येही 2770 वस्तूंचा अशाच लिलावामध्ये समावेश करण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here