बजाज ऑटोच्या अध्यक्षपदी नीरज बजाज…राहुल बजाज यांनी दिला राजीनामा

आपल्या वाढत्या वयाचे कारण पुढे करीत बजाज ऑटो ग्रुपचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी दिला आपल्या पदाचा राजीनामा..

न्यूज डेस्क :- देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी बजाज ऑटोचे अध्यक्ष राहुल बजाज यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बजाज ऑटो हे दुचाकी वाहन उद्योगात एक मोठे नाव आहे. १९७२ मध्ये बजाज ऑटोच्या स्कूटर चेतकने भारतीय बाजारपेठेत विक्रम नोंदविला होता. एक वेळ अशी होती की या स्कूटरची प्रतीक्षा कालावधी 4 ते 5 वर्षे इतका होता.

बुकिंगनंतर ग्राहकांना बर्‍याच वर्षांपासून स्कूटरची प्रतीक्षा करावी लागत असे.अद्याप या स्कूटरची क्रेझ कमी झालेली नाही. अलीकडेच बजाज ऑटोने चेतक स्कूटरची इलेक्ट्रिक व्हर्जन बाजारात आणली आहे.

राहुल बजाज यांच्या राजीनाम्यानंतर कंपनीचे कार्यकारी संचालक असलेले नीरज बजाज हे बजाज ऑटोचे नवे अध्यक्ष असतील.वयाच्या 30 व्या वर्षी त्यांनी कंपनीची सूत्रे हाती घेतली होती.१९६८ मध्ये राहुल बजाज यांनी वयाच्या ३० व्या वर्षी ‘बजाज ऑटो लिमिटेड’ या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. त्यावेळी ते कंपनीचे सीईओ बनणारे सर्वात तरुण भारतीय होते.

राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांचे नातू आहेत. राहुल यांनी दिल्लीतील सेंट स्टीफन्स कॉलेजमधून आपले शिक्षण घेतले आहे. त्यांनी मुंबईच्या लॉ विद्यापीठाकडून कायद्याची पदवीही मिळविली आहे.हार्वर्ड बिझिनेस स्कूलमधून त्यांनी एमबीएची पदवीही घेतली आहे. एमबीए डिग्री घेतल्यानंतर राहुल भारतात परत आले आणि बजाज ऑटो कंपनीचा पदभार स्वीकारला.

राहुल बजाज यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली बजाज ऑटोला एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले. जेव्हा सरकारकडून कंपन्यांना उत्पादनावर फ्री होल्ड मिळाला नाही त्या काळात बजाजचा चेतक स्कूटर इतका लोकप्रिय झाला की लोक दोन ते तीन वर्षे त्याची वाट पाहत असत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here