ईद-ए-मिलादुन्नबी पैगंबर जयंती निमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्हाच्या वतीने महारक्तदान शिबिर संपन्न…

सांगली – ज्योती मोरे.

ईद-ए-मिलादुन्नबी पैगंबर जयंती निमित्त राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा व राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अल्पसंख्याक शहर जिल्हाच्या वतीने महारक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले होते.याचं उदघाटन शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी राहुल दादा पवार, उत्तम साखळकर, शेखर माने,अभिजित हरगे,संगीता हरगे, सागर घोडके, विजय माळी, हरिदास पाटील, बल्लू केरीपाळे, वंदना चंदनशिवे, अनिता पांगम, राधिका हरगे शुभम जाधव, सुनील भोसले, मुसा समडोळे, गौस मुलानी, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते. दोन ठिकाणी शिबिर घेण्यात आले.

नळ भाग परिसर व 50 फुटी शामराव नगर येथे घेण्यात आले. जवळपास 125 रक्त दात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचे नियोजन शहर जिल्हाध्यक्ष आयुब भाई बारगीर, रियाज भाई शेख यांच्या पुढाकाराने झाले.

नियोजन इर्शाद भाई पखाली, मुन्ना शेख, सद्दाम कुरणे, अशरफ चाऊस, जुनेद जमादार, सरफराज शेख, फारूक बागवान आयुब मुजावर वाजीद खतीब, अशरफ शेख, वसीम खातीब, आयुब कागदी, इम्रान मुल्ला, बरकत हकिम, आसिम मुलानी, शफीक मुल्ला, नदीम मुल्ला, यांनी केले. या भागातील ज्येष्ठ हाजी नायकवडी हाजी अमिरहमजा तांबोळी, फारुख शेख इलियास हकीम यिच्यासह नागरिक,कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here