Monday, February 26, 2024
HomeMarathi News TodayNCP MP | खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या कवितेने घातला सोशल मिडीयावर धुमाकूळ…पाहा...

NCP MP | खासदार डॉ.अमोल कोल्हे यांच्या कवितेने घातला सोशल मिडीयावर धुमाकूळ…पाहा Video

Share

NCP MP : संसदेत कविता आणि कवितेतून खासदारांचा हल्लाबोल आणि पलटवार. काही गमतीशीर कविता वाचतात तर काही गंभीर होऊन देशाची परिस्थिती कवितेतून पुढे आणतात. राष्ट्रवादीच्या खासदाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते संसद भवनात कविता वाचत आहेत. या कवितेचे खूप कौतुक होत आहे.

राष्ट्रवादीचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी संसद भवनात कवितेतून आपले मनोगत व्यक्त केले. राम मंदिर आणि सरकारचे वचन यांचा संबंध जोडणारी कविता त्यांनी वाचली. ज्यामध्ये राम मंदिर, महागाई, रोजगार, खाजगीकरण आदी प्रश्नांचा समावेश आहे. कवितेच्या काही ओळी खाली लिहिल्या आहेत.

राममंदिराच्या पायऱ्यांवर संविधानाचे रक्त!…हिंदूंच्या पाचशे वर्षांच्या स्वप्नाची पूर्तता झाल्याबद्दल उत्सव करताना, या सरकारने देशाच्या संविधानाचा वेळोवेळी केलेला खून स्वतःला हिंदू मानणारा कोणीही विसरू शकणार नाही. माफ करणं तर दूरच. १५ लाखांचा जुमला, किसानांचे आंदोलन, महिला कुस्तीपटूंची वेदना, २ कोटी जॉब्सचं आश्वासन, वाढणारी सांप्रदायिकता, उद्योगपतींचे पाय चाटणें… उधळलेल्या गुलालाखाली यातलं काहीही लपणार नाही… आम्ही लपू देणार नाही… राम कसम!!!


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: