राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षा तर्फे गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढ व प्रचंड महागाई विरोधात केंद्राविरुध्द आक्रमक निषेध आंदोलन…

नागपूर – शरद नागदेवे

महागाईमुळे सामान्य जनतेला जीवन जगणे कठीण झाले असून.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नागपुर शहराच्या वतीने शहर अध्यक्ष श्री.दुनेश्वर पेठे व ग्रामीणचे अध्यक्ष श्री.शिवराजबाबा गुजर यांच्या नेतृत्वात गॅस, पेट्रोल, डिझेल, खाद्य तेल, ईंधन दरवाढ, महागाई, बेरोजगारी व डुबीत बँकिंग व्यवस्था विरोधात आज व्हेरायटी चौक गांधीपुतळा येथे बिजेपी सरकारच्या विरोधात आक्रमक निषेध आंदोलन करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी महागाई विरोधात जोरदार निदर्शने केली व चुलीवर पोळ्या व स्वयंपाक करुन केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.आंदोलनात तृतीयपंथी सुध्दा सामील झाले होते त्यांनी सुध्दा रोष व्यक्त केला.ईतिहासात प्रथमच पेट्रोल दर रु. १०५ च्या वर झाला आहे तर गॕस सिलेंडर २५.५० पैशानी महागला आहे,२०१४ साली ४५० रुपयाला मिळणारे सिलेंडर ८५० रुपयाचे झाले आहे.ही प्रचंड दरवाढ व महागाई यामुळे सर्वांच बजेट कोडमडल आहे.

सामान्य जनता जगायच कस या चिंतेत आहे.दुसरीकडे एस.टी.ची माल वाहतुक सुध्दा वाढली आहे. एकीकडे असह्य महागाई असतांना अल्पबचतीवरचे व्याज जर ६.५०% म्हणजे निम्म्यावर कमी केलेले आहे. देशातील जवळपास ३०%जनता बचतीवर मिळत असलेल्या व्याजावर आपला उदरनिर्वाह करतात.मात्र बचतीवर सतत कमी होणा-या व्याज दरामुळे ज्येष्ठ नागरीक धास्तावलेला आहे.जगायच की मरायच हा प्रश्न त्याच्यासमोर आहे.

एकीकडे कोरोना तर दुसरीकडे प्रचंड महागाई,बंद पडलेले उद्दोग व बेरोजगारी यामुळे भयावह स्थीती निर्माण झाली आहे. शहरी व ग्रामीण भागात कोरोना प्रादुर्भाव असतांना मानवी मुल्यांची पायमल्ली करुन नागरीकांच्या जिवनाशी केंद्र सरकार खेळत आहे. आपत्तीमुळे हतबल झालेला शेतकरी ईंधन व खतांच्या भाववाढीमुळे शेती करायची तरी कशी या चिंतेत आहे. लॉकडाऊन मुळे उद्दोगधंदे बुडाले आहे ,बेरोजगारी खुप वाढली आहे.

बँकीग व्यवस्था अडचणीत आहे. बाजार व्यवस्था कोडमडल्यामुळे शेतक-यांचा उत्पादीत शेतमाल खराब होत आहे. एकीकडे महागाई दर १३% वर पोहचला आहे तर दुसरीकडे केंद्र सरकारची ईंधनावरील करवसुली ५ लाख २८ हजार वर पोहचली आहे .अल्पबचतीवरील व्याज दर कमी करुन बँकानी जवळपास ४ लाख करोड रुपये कमावले आहे.प्रचंड करवसुलीतुन मात्र केंद्र सरकारने जनतेला कोणताही दिलासा दिलेला नाही.नेमका हा पैसा सरकार कुठे खर्च करीत आहे हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

वाहतुक दर महागले यामुळे व्यावसायीक जगतात याचा प्रतिकुल प्रभाव पडला आहे. व्यापारी वर्ग अडचणीत आला आहे. मोदी सरकारच संपुर्ण आर्थीक धोरण कुचकामी ठरले आहे. देश आर्थीक संकटात आहे महागाई प्रचंड वाढली आहे मात्र यावर पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी व वित्तमंत्री डॉ. निर्मला सितारमण काहीच बोलत नाही याचे आश्चर्य वाटत आहे.

पेट्रोल , ईंधन गॅस, भाववाढ व महागाई विरुध्द हे निषेध आंदोलन असुन त्वरीत ही दरवाढ मागे घ्यावी अन्यथा आंदोलन अधिकाधिक तिव्र करण्यात येईल असा ईशारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने दिला आहे..आंदोलनात अल्पसंख्यक विभाग राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, माजी आमदार दीनानाथ पडोळे,ओबीसी प्रदेश अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, प्रशांत पवार, गंगा प्रसाद गालवंशी, प्रदेश प्रवक्ता प्रविण कुंटे पाटिल, दिलीप पंकुले,

बजरंग सिंह परिहार, जानबा मस्के, जावेद हबीब, वर्षा शामकुले, अविनाश गोतमारे, महादेराव फुके, श्रीकांत शिवशंकर, लक्ष्मी सावरकर, शैलेंद्र तिवारी, रिज़वान अंसारी, रविंद्र इटकलवार, रविनीश पांडे, अशोक काटले, महेंद्र भांगे, विशाल खांडेकर, रवि पराते, रूद्र धाकड़े, प्रकाश लिखनकर, जतिन झाड़े, प्यारुद्दीन काजी, अमोल पालपल्लीवार, अमरीश डोरे, शिव बेंडे, संतोष सिंह, सुनीता खत्री, स्वाति कुंभलकर, भैया लाल ठाकुर, सुनील लांजेवार, साजिद अली,

मालती मुळे, जतिन मलकान, अनिल बोकड़े, प्रणय जांभूलकर, राकेश बोरिकर, ज्योति लिंग्यात, कल्ला नायक, मोहसिन शेख, पवन रावत, दीपक सलूजा, आकाश थेटे, रेखा कृपाले, शबाना सैयद, मंदा मेश्राम, संगीता खोबरागड़े, जाकिर शेख, मनीष मोरे, राजेश शर्मा, ज्योति मेश्राम, कनिजा शेख, धर्मपाल वानखेड़े, वीरेंद्र निखार, सौरव मिश्रा, तन्हा नागपुरी, मुन्ना अंसारी, अब्दुल मजीद, अरविंद ढेंगरे, एकनाथ फलके, प्रणय महेशकर, सचिन मोहोड,

इस्माईल अन्सारी, मुस्ताक अंसारी, लता चंद्रशेखर, अनमोल मुदलियार, बेबो खान, राजेश अडव, अजहर पटेल, दयाशंकर दुबे, सुरज सिंग बाठ, विश्वजीत सावरिया, संजय तिवारी, पूनिष ठाकरे, आतिश डोंगरे, श्रीकांत आंबुलकर, चेतन म्हसळे, फर्जाना खान, अस्मिया खान, अक्षरा सरकार, शहजहा शेख, विद्या शाहू, शोएब असद, इसशाद असद, कमलेश बावनकुळे, शुभम चंद्रशेखर, जीवन रामटेके, उदय टेकाडे, युवराज मिश्रा, राजू तलिया,

सैयद रियाज अली, हेमंत डोर्ले, जावेद खान, फहीम अंसारी, प्रशांत तिजारे, अक्षय मारोतराव, इंद्रजीत सिंह सैनी, देवा भावरा, पवन सातपुते, विजय माटे, चारुशिला चंद्रशेखर, उषा साहू, फहीम खान, प्रवीण पाटिल, दिलीप पालंदुरकर, बाबाराव गावंडे, शुभम लांडगे, नागेश वानखेड़े,

संदीप मेंडे, अब्दुल सलीम, मनोज मलोटकर, संजय आवडे, विक्रम राऊत, शकीर अन्सारी, मंजूर सोडघाटे, अर्जुन राणा, विक्की घोडे, मिलिंद गावंडे, सुषमा बंगाले, सीमा चरपे, बबीता सोमकुवर, द्वारका शाहू, हेमंत शाहू, रोशन निर्मलकर, मुन्ना शाहू, नर्गिस शेख, ज्योती लिंगायत, कैलास मेश्रम, मनोज पौनिकर, हनी खेत्रपाल, निखिल कोचे, ओयसिस मेश्राम आदी सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here