पेट्रोल दरवाढीविरोधात निषेधार्थ राष्ट्रवादीचा सायकल मोर्चा… एक हि केंद्रीय मंत्री ठाण्यात फिरू देणार नाही… श्री आनंद परांजपे अध्यक्ष ठाणे जिल्हा शहर…

ठाणे – लॉकडाऊनपासून आतापर्यंत सुमारे अकरा वेळा इंधनाच्या दरामध्ये वाढ झाली आहे. कोरोनामुळे सामान्य माणूस मेटाकुटीला आलेला असताना इंधनाच्या दरवाढीमुळे महागाईत वाढ होऊन सामान्यांना जगणे नकोसे झाले आहे. भाजपच्या महाराष्ट्रातील पुढार्‍यांना ही दरवाढ दिसत नाही, असा आरोप करीत देवेंद्र फडणवीस यांनाच निवेदन देऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इंधन दरवाढ कमी करण्यासाठी विनंती करावी,

या मागणीसाठी ठाण्यातील शेकडो राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सायकल मोर्चा काढला. मात्र, ठाणे पोलिसांनी या मोर्चेकर्‍यांना नितीन कंपनी सिग्नल येथेच अडवून ताब्यात घेतले.अच्छे दिनचे स्वप्न दाखवित केंद्रात सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशात महागाईचा आगडोंब उसळविला आहे. पेट्रोल पंप म्हणजे ‘मोदी वसुली केंद्र’ झाले आहेत.

या दरवाढीचा निषेध करण्यासाठी ठाण्यातील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे युवा प्रदेशाध्यक्ष महेबून शेख, शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे युवक अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या नेतृत्वाखाली सायकल मोर्चा काढण्यात आला.पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला असून, सध्या पेट्रोलने नव्वदी पार केली मात्र,

त्यांची दखल घेतली जात नसल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ठाणे ते मुंबई भाजप प्रदेश कार्यालय असे सायकल मोर्चाचे नियोजन केले होते. या मोर्चासाठी राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख हे उपस्थित होते.यावेळी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयापासून मुंबईच्या दिशेने सायकल चालवित कूच केले. या आंदोलनात युवकांसह युवती, महिलांचाही मोठा सहभाग होता.

मात्र, नितीन कंपनी जंक्शन जवळ पोलिसांनी मोर्चेकर्‍यांना अडवून पुढे जाफ दिले नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांनी तिथेच जोरदार घोषणाबाजी करीत रस्ता अडवून धरला.
यावेळी मेहबूब शेख यांनी सांगितले की, बहोत हो गयी महंगाई की मार.. अशी घोषणा देत मोदी सरकार सत्तेवर आले आहे. याच मोदी सरकारने सामान्यांचे जगणे अवघड करुन ठेवले आहे. सर्वसामान्यांच्या खिशावर दरोडा घालण्याचा प्रकार मोदी सरकारने केला आहे.

क्रूड ऑईलच्या किमती कमी झालेल्या असतानाही इंधनाचे दर वाढवून मोदी सरकार सामान्यांचे कंबरडे मोडत आहे. भविष्यात जर हे दर कमी केले नाही. तर केंद्रीय मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही. असे आव्हान श्री आनंद परांजपे साहेब ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष यांनी केलं. क्रूड तेलाच्या किमती वाढलेल्या होत्या तसेच साठवण क्षमता कमी होती. तेव्हा म्हणजे आघाडी सरकारच्या काळात इंधनाचे दर आवाक्यात होते.

मात्र आता क्रूड तेलाच्या किमती कमी झालेल्या असताना तसेच साठवण क्षमता वाढलेली असतानाही इंधनाचे दर दररोज वाढतच आहेत. आज रोजी पेट्रोलचे दर 91.18 रूपये तर डिझेलचे दर 81.44 रुपयांवर गेले आहेत. इंधनाचे दर कमी करण्यासाठी अनेकदा निवेदने दिली आहेत. मात्र, केंद्र सरकार त्याकडे लक्ष देत नाही. म्हणूनच मोदी साहेबांचे विश्वासू शिलेदार म्हणून आम्ही आपणालाच साकडे घालत आहोत.

जर, हे दर कमी केले नाहीत; तर, ठाण्यात एकाही केंद्रीय मंत्र्याला येऊ देणार नाही, असा इशारा दिला.या आंदोलनात प्रदेश चिटणीस तथा नगरसेवक सुहास देसाई, नगरसेवक अशरफ पठाण (शानू), युवक अध्यक्ष विक्रम खामकर, माजी युवक अध्यक्ष मंदार केणी, महिला कार्याध्यक्षा सुरेखाताई पाटील, युवती अध्यक्षा पल्लवी जगताप, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष कैलास हावळे,

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विरु वाघमारे, सचिन पंधारे, राजु चापले, जतीन कोठारे, अ‍ॅ्ड. विनोद उतेकर, रमेश दोडके, दिलीप नाईक, परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, मोहसीन शेख, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, सलीम पटेल, विधानसभा कार्याध्यक्ष महेंद्र पवार, ब्लॉक अध्यक्ष समीर पेंढारे, रत्नेश दुबे, निलेश फडतरे, निलेश कदम, विशाल खामकर, विलास पाटील, ब्लॉक कार्याध्यक्ष कौस्तुभ धुमाळ,

संताजी गोळे, किशोर चव्हाण, तुकाराम गायकवाड, जिल्हा सरचिटणीस प्रभाकर सावंत, रविंद्र पालव, संदिप जाधव, सचिव शिवा कालु सिंह, लगबीर सिंग गील, अजित सावंत, शेखर भालेराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी प्रविण सिंग, संजीव दत्ता, संकेत नारणे, युवक विधानसभा अध्यक्ष अभिषेक पुसाळकर, ब्लॉक अध्यक्ष रोहित भंडारे, संदिप येताळ, निखिल तांबे, विधानसभा कार्याध्यक्ष दिनेश बने, के. पी. अहद,

सरचिटणीस सौरभ वर्तक, समीर नेटके, वॉर्ड अध्यक्ष निहार नलावडे, साहील तिडके, वागळे उपाध्यक्ष दिपक मोरे, निलेश जाधव, वॉर्ड अध्यक्ष किरण माने, मिलिंद डोंगरे, नितीन पोटफोडे, हेमंत बनसोडे, संजय साळुंखे ,कळवा मुंब्रा विधानसभा युवती अध्यक्षा पुजा शिंदे, शर्मिली पारकर , नेहा नाईक, लिना कोलपकर, .ऐश्वर्या मोटे, सायली मढवी, स्नेहल कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.तर दिवा विभागातून मनोज कोकणे,

ठाणे जिल्हा चिटणीस यांच्या मार्गदर्शनाखाली दिवा विभागातील सूर्यकांत कदम, दिवा ब्लाॅक 27 अध्यक्ष,पुजा मोहिते दिवा शहर ब्लॉक युवती अध्यक्षा, शितल लाड, दिवा शहर ब्लॉक युवती कार्याध्यक्षा,शशिकला लोखंडे,दिवा ब्लॉक 27 युवती अध्यक्षा,नेहा कोकणे,दिवा ब्लॉक 28 युवती अध्यक्षा,संगिता किसन कारंडे,दिवा ब्लॉक क्र.28 (अ) युवती विभाग अध्यक्षा यांनीही हिरिरीने मोर्चात सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here