राष्ट्रवादी कॉंग्रेस नागपूर शहर जिल्हाध्यक्ष पदी नगरसेवक दुणेश्वर पेठे यांची नियुक्ती…

नागपूर – शरद नागदेवे

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नागपूर शहर जिल्हाध्यक्ष पदी नगरसेवक दुणेश्वर पेठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील आणि खासदार प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत दुणेश्वर पेठे यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. पक्ष बळकटीसाठी व‌ पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी दुणेश्वर पेठे यांचे सहकार्य राहील,असा विश्वास प्रदेशाध्यक्ष ना.जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे,युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख,प्रदेश सरचिटणीस प्रवीण कुंटे पाटील, नागपूर ग्रामीण अध्यक्ष शिवराज गुजर, अल्पसंख्याक विभाग कार्याध्यक्ष जावेद हबीब उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here