रामटेक – राजु कापसे
कविकुलगुरु इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी अँण्ड सायंस (किट्स) रामटेक येथे २ महा सिग्नल एनसीसीचे वार्षिक ७ दिवसीय प्रशिक्षण शिबिर नुकतेच संपन्न झाले. कीटस रामटेक व नरेंद्र तिडके महाविद्यालय तर्फे संयुक्त आयोजन करण्यात आले होते.उद्घाटक एनसीसी कमांडिंग आफिसर लेफ्टनंट कर्नल डी.बी.राय, नागपूर यांनी कॅडेटसचे स्वागत करून प्रशिक्षण शिबिर व प्रमाणपत्र बि व सी यांचे महत्व सांगीतले.
प्रशिक्षक सुभेदर चंदन सिंग, हवालदार आर.पी. सिंग , सचिन शिवले सहीत आदी सशस्त्र सेना, कवायती, शस्त्र प्रशिक्षण, नकाशा वाचन, फील्ड क्राफ्ट, बॅटल क्राफ्ट, कॉम्यून क्राफ्ट, या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. बाळासाहेब लाड, सीटीओ बी. वेंकण्णा यांनी भारताचा सिमा, सीमेवर एनसासी कॅडेटची १९६२ चा यूद्धात भूमिका, कैम्प सेफ्टी, सिक्यूरीटी या विषयावर मार्गदर्शन केले. पोलिस उपनिरीक्षक सीमा बेंद्रे यांनी वाहतुक नियमांचे महत्त्व सांगीतले. या वेळी वृक्षारोपन व रक्तदान शिबिर घेण्यात आले.
प्राचार्य डॉ अविनाश श्रीखंडे, डीन डॉ. पंकज आस्टनकर , एसएनटी महाविध्यालयाचे प्राचार्य संगीता टक्कामोरे, लेफ्नंट कर्नल डी.बी. राय यांचे हस्ते प्रमाणपत्र व पदकाचे वितरण विजेते व उपविजेते कॅडेटस याना करण्यात आले.

डी.बी.राम यांनीकार्यक्रमाचा यशस्वीतेकरीता वोडीथला एज्यूकेशन सोसायटीचे सचिव वी. श्रीनिवासराव, किट्सचे प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे संचालन देवर्षी पटेल श्रेयश राऊत यानी केले. कार्यक्रमाचा यशस्वितेकरिता करीता किट्स व्यवस्थापन, डीन, असोसिएट डीन, विभाग प्रमुख, प्रोजेक्ट आफिस, कर्मचारी व सर्व कॅडेट्स यांनी प्रयत्न केले.