पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी पेरून ठेवलेले साहित्य जप्त…

गोंदिया – राजेश कुमार तायवाडे

सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या गडमाता मंदिर परिसरात पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी स्फोटक साहित्य व हत्यार पेरून ठेवले होते. याबाबतची गोपनीय माहिती नक्षल सेल गोंदियाला मिळाली. त्या माहितीवरुन पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व उपविभागीय अधिकारी नालकुल यांच्या मार्गदर्शनात नक्षल सेल, बॉम्बशोधक पथकाच्या मदतीने सदर साहित्य पोलिसांनी जप्त केले.

7 नोव्हेंबर रोजी गोंदिया नक्षल सेलला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात नक्षल से गोंदिया सी 60 पथक गोंदिया व सालेकसा, तसेच बॉम्ब नाशक पथक व श्वान पथकाच्या मदतीने सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत गडमाता परिसरात शोध घेण्यात आला. तेथे पोलिसांना ठार मारण्याच्या उद्देशाने नक्षल्यांनी गाडून ठेवलेले स्फोटक साहित्य, नक्षल साहित्य व काही हत्यार पोलिसांनी जप्त केले.

यात 80 फुट वायर, 8 जिलेटीन काड्या, नॉन इलेक्ट्रिक डिटोनेटर, 2 गावठी बंदूक, राऊंड-2, मेडिसीन बॉक्स, जुने पिस्टलसारखे दिसणारे 2 शस्त्र, नक्षल गणवेश, इलेक्ट्रिक डिटोनेटर 11, प्रिंटेड सर्किट बोर्ड 2, हिरव्या रंगाचे ओलसर स्फोटक पाऊडर 700 ग्राम, जुने देशी कट्टे 2, राखाडी रंगाचे स्फोटक सदृश्य पाऊडर 700 ग्राम या साहित्यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here