सुरज फौंडेशन संचलित, नव कृष्णा व्हॅली स्कूल व व्हाईट हॅट ज्युनिअर कोडिंग यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली जिल्ह्यामध्ये प्रथमच कोडींग क्लास ची सुरुवात…

सांगली – ज्योती मोरे.

नव कृष्णा व्हॅली स्कूल मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्नशील असते काळाची गरज ओळखून, मुलांना टेक्नोसॅव्ही होण्यासाठी व त्यांचा आय.टी. चा पाया भक्कम होण्यासाठी स्कूल ने एक मोठे पाऊल उचलले आहे. ते म्हणजे व्हाईट हॅट ज्युनियर कोडींग क्लासेस नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनियर कॉलेज यांनी व्हाईट हॅट ज्युनियर कोडींग या कंपनीशी संलग्न होऊन मुलांना कोडींग कोर्स ची सुरुवात केली या क्लास मधून मुलांचे लॉजिकल थिंकिंग, मॅच, सायन्स यांची कौशल्य सुद्धा अवगत होणार आहे.

त्या कोर्सेचे आउटपुट म्हणजे मुले स्वतःचे ॲप, गेम, वेब अप्लिकेशन, वेबसाईटवर तयार करू शकतात. काळाबरोबर जाण्यासाठी व मुलांना अपडेट राहण्यासाठी अशा प्रकारच्या कोर्स ची आवश्यकता होती. या कोर्सची सुरुवात नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम व मराठी माध्यम मध्ये आज झाली.

या कार्यक्रमासाठी व्हाईट हॅट कंपनीचे मा. श्री. भाविक गोस्वामी सर, सुरज फौंडेशन चे सचिव मा. श्री एन.जी. कामत सर, नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका मा. सौ.संगीता पागनीस मॅडम उपमुख्याध्यापक मा. श्री प्रशांत चव्हाण सर, नव कृष्णा व्हॅली मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक मा.श्री. अधिकराव पवार सर
आय. टी.डिपार्टमेंट प्रमुख मा. श्री.राजेंद्र पाचोरे, अकाउंट विभागाचे प्रमुख मा. श्री.श्रीशैल मोटगी, संस्थेच्या एच.आर. मा. सौ. गितांजली पाटील देशमुख मॅडम,

सुरज स्पोर्ट चे सचिव मा. श्री. विनायक जोशी सर व शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. पाहुण्यांचे स्वागत मा. श्री.अधिकराव पवार सर व श्री. प्रशांत चव्हाण सर यांनी करून दिले व संस्थेचे सचिव मा. श्री.एन.जी.कामत सर यांनी मुलांना प्रोत्साहित करून या कोर्सचे लाभ घेण्याचे आवाहन केले तसेच व्हाईट हॅट जूनियर कोडींग चे मा. श्री भाविक सर यांनी येणाऱ्या सहा महिन्यांमध्ये आपल्या स्कूल चे मुले व मुली ॲप विकसित करतील अशी ग्वाही दिली.

यानंतर इंग्रजी माध्यम व मराठी माध्यम वर्गावर कोडींग क्लास ची सुरुवात झाली. मुलांनी क्लास संपल्यानंतर अतिशय उत्साहाने आपला अभिप्राय नोंदवला की, त्यांना हा कोर्स करण्यासाठी ते भरपूर इच्छुक आहेत. संस्थेचे संस्थापक मा. श्री. प्रवीण लुंकड यांनी मुलांना या नवीन कोर्ससाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here